भारतीय संघ २०१९ साली झालेल्या विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यांचे आव्हान संपुष्टात आले होते. या विश्वचषकात भारताची फलंदाजी चांगली झाली नाही. त्यामुळे या संघात एक फलंदाज असला असता तर भारताने हा विश्वचषक जिंकला असता, असे म्हटले जात आहे. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जर चांगली फलंदाजी झाली असती, तर हा सामना भारत जिंकू शकला असता. कारण भारताचे पहिले तीन फलंदाज झटपट बाद झाले होते. त्यामुळे भारताला पराभवाचा धक्का बसला, असे म्हटले जाते.
वाचा-
या विश्वचषकामध्ये अंबाती रायुडू असला असता तर भारताने विश्वचषक जिंकला असता, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने सांगितले आहे. कारण या विश्वचषकात भारताला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांची उणीव जाणवत होती. रायुडू चौथ्या क्रमांकावर भारताकडून खेळत होता. पण त्याची निवड विश्वचषकासाठी करण्यात आली नाही. त्यामुळे भारताला चौथ्या स्थानावर नेमके कोणाला पाठवायचे, हा प्रश्न संपूर्ण स्पर्धेत जाणवला होता. त्यामुळे जर रायुडू संघात असला असता तर भारताने विश्वचषक जिंकला असता, असे रैनाने म्हटले आहे.
वाचा-
विश्वचषकात भारतीय संघ चौथ्या स्थानावर प्रयोग करत असल्याचे पाहायला मिळाले. काहीवेळा विजय शंकर, तर काही वेळी रिषभ पंतला चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. पण या दोघांपैक्षा क्रिकेटचा जास्त अनुभव हा रायुडूकडे नक्कीच जास्त होता.
वाचा-
रैना पुढे म्हणाला की, ” विश्वचषटकापूर्वी रायुडू हा भारताकडून चौथ्या क्रमांकावर खेळत होता आणि चांगली कामगिरी करत होता. त्यामुळे विश्वचषकातही भारतीय संघाकडून रायुडूला खेळवले गेले पाहिजे होते. कारण या क्रमांकावर येऊन नेमके काय करायचे असते, हे त्याला चांगले समजले होते. पण निवड समितीने त्याचा नावाच विचार विश्वचषकासाठी केला नाही आणि त्यामुळेच भारताला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धक्का बसला.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.