भारतीय कसोटी संघात एक मोठा बदल करण्यात आला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पराभवानंतर टीम इंडियात एक मोठा बदल झाला आहे. संघातील अनुभवी आणि स्टार कसोटीपटू चेतेश्वर पुजाराला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्याच्या जागी मुंबईचा युवा फलंदाज यशस्वी जयसवाल याला संघात स्थान मिळाले आहे. तर आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर कसोटी संघात स्थान मिळवणाऱ्या तसेच WTC फायनलमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या अजिंक्य रहाणेला पुन्हा एकदा उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
खराब फॉर्ममुळे अजिंक्यला कसोटी संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर त्याने देशांतर्गत आणि आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून संघात पुन्हा एकदा स्थान मिळवले. इतक नाही तर जे पद त्याच्याकडून काढून घेण्यात आले होते ते पुन्हा अजिंक्यने मिळवले. आयपीएल बरोबरच ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील कामगिरीचा त्याला फायदा झाला. अजिंक्यने फायनल मॅचमधील पहिल्या डावात ८९ तर दुसऱ्या डावात ४६ धावा केल्या होत्या.
असा आहे वेस्ट इंडिज दौऱ्यातील भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत, ईशान किशन, आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी
वनडे मालिकेसाठी संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ईशान किशन, हार्दिक पंड्या, शार्दूल ठाकूर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयेदव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमारन मलिक, मुकेश कुमार
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More