नवी दिल्ली: माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू आहे. त्याचवेळी धोनीची टी-२० कारकीर्द अजूनही शिल्लक आहे, असं सांगून टीम इंडियाचे प्रशिक्षक यांनी टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात त्याचा समावेश केला जाऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. धोनीमध्ये टी-२० क्रिकेट अजूनही शिल्लक आहे. तो आयपीएलमध्ये खेळणार आहे, असं शास्त्री यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.

गेल्या काही महिन्यांपासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नाही. क्रिकेटपासून सध्या तो दूरच आहे. मागील मालिकांसाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळं धोनी आता क्रिकेटमधून संन्यास घेणार का, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे. मात्र, त्याच्यात अजूनही टी-२० क्रिकेट शिल्लक आहे, असं सांगून रवी शास्त्री यांनी त्याच्या परतण्याचे संकेत दिले आहेत. ‘धोनीच्या बाबतीत सांगायचं झालं तर, तो स्वतःला संघावर कधीच लादत नाही. आपण यापुढे खेळू शकत नाही असं त्याला वाटलं तर, तो कसोटीप्रमाणे स्पष्ट सांगेल की मी खूप खेळलो आहे. मात्र, आयपीएलमध्ये त्यानं चांगली कामगिरी केली तर, तो या प्रकारात पुढेही खेळणं सुरूच ठेवू शकतो,’ असं रवी शास्त्री म्हणाले. त्यामुळं ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात त्याचा समावेश केला जाऊ शकतो, असे संकेत रवी शास्त्री यांनी या वक्तव्यातून दिल्याचं मानलं जात आहे.

धोनी जुलै २०१९पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळला नाही. मात्र, क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे स्पष्ट संकेतही त्यानं दिले नाहीत. आगामी टी-२० वर्ल्डकप ऑस्ट्रेलियात होणार आहे. तेथे त्याचा अनुभव उपयोगी पडू शकतो, असं बोललं जात आहे. आयपीएलमध्ये तो खेळणार आहे. आगामी टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीनं त्यानं तयारी सुरू केली आहे, असंही म्हणता येईल. दरम्यान, धोनीची न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड केली जाते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here