नवी दिल्ली: आयपीएलचा १३वा हंगाम १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये होणार आहे. मार्चमध्ये होणारी ही स्पर्धा कोरनामुळे पुढे ढकलल्यामुळे आता चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. आयपीएलच्या निमित्ताने पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यातील थरार पाहायला मिळणार आहे.

वाचा-
आयपीएलमध्ये काही विक्रम असे झाले आहेत की जे वाचल्यानंतर तुम्ही हैराण व्हाल. तर काही विक्रम असे आहेत जे कोणत्याच खेळाडूला आपल्या नावावर असू नयेत असे वाटले. आयपीएलमधील असाच एक नकोसा वाटणारा विक्रम म्हणजे सर्वाधिक टाकण्याचा होय. जाणून घेऊयात आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक नो बॉल कोणी टाकले आहेत.

वाचा-
लसिथ मलिंगा- स्पर्धेतील एक यशस्वी गोलंदाज मलिंगाने आतापर्यंत १८ नो बॉल टाकले आहेत. या यादीत पहिला पाचमध्ये सर्वात शेवटी मलिंगाचा क्रमांक लागतो. मलिंगाने सर्वात चांगली गोलंदाजी करून देखील त्याचे नाव या यादीत आहे. त्याने आयपीएलमध्ये १२२ सामने खेळले असून त्यात २ हजार ८२७ चेंडू टाकले आहेत.

अमित मिश्रा- आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा हॅटट्रिक घेणारा फिरकीपटू अमित मिश्राने २० नो बॉल टाकले आहेत. त्याने १४७ सामन्यात १५७ विकेट घेतल्या आहेत.

वाचा-
इशांत शर्मा- आयपीएलमध्ये इशांतने आतापर्यंत २१ नो बॉल टाकले आहेत. त्याने ८९ सामन्यात ७१ विकेट घेतल्या आहेत. दिल्लीकडून खेळणाऱ्या इशांतने स्पर्धेत १ हजार ९०७ चेंडू टाकले आहेत.

वाचा-

जसप्रित बुमराह- भारतीय संघाचा आघाडीचा गोलंदाज जसप्रितचे नाव या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २१ नो बॉल टाकले आहेत. बुमराहने करिअरमध्ये ८२ सामन्यात ८२ विकेट घेतल्या आहेत.

वाचा-
श्रीसंत- आयपीएलमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकण्याचा विक्रम श्रीसंतच्या नावावर आहे. त्याने ४४ सामन्यात ८८० चेंडू टाकत ४० विकेट घेतल्या असून त्यात २३ नो बॉल टाकले आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक नो बॉल टाकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here