नवी दिल्ली: आयपीएलमधील संघाचा कर्णधार विराट कोहलीने दुबई पोहोचल्यानंतर चाहत्यांसाठी एक फोटो शेअर केला. पण आरसीबीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत विराट संघासोबत दिसला नाही. त्यामुळे अशी चर्चा सुरू झाली की विराट संघातील अन्य सहकाऱ्यांसोबत दुबईला गेला नाही.

वाचा-
शुक्रवारी जेव्हा आरसीबीचा संघ दुबईत पोहोचला. त्यानंतर काही वेळातच विराटने एक फोटो शेअर केला. यावरून तो देखील दुबईत पोहोचल्याचे कळाले. विराटच्या दुबई जाण्याबाबत मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार तो एका खासगी चार्टर्ड प्लेनने दुबईला गेला. विराटने जैव सुरक्षाविचार करता हा निर्णय घेतल्याचे समजते. तो गेल्या पाच महिन्यांपासून घरीच होता. आता आयपीएलसाठी बेंगळुरूला प्रवास करून धोका पत्करण्याची त्याची इच्छा नव्हती. कारण मुंबईत सर्वाधिक करोना रुग्ण आहेत.

वाचा-

वाचा-

विराटने मुंबईत स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले होते. त्याने करोना चाचणी देखील केली होत. त्यामुळेच तो बेंगळूरुला न जाता थेट मुंबईतून खास विमानाने एकटा दुबईला गेला. तर संघातील काही खेळाडू युजवेंद्र चहल, उमेश यादव, नवदीप सैनी आणि अन्य खेळाडू काही दिवस आधी बेंगळूरत पोहोचले होते. हे सर्व खेळाडू एक आठवडा आयसोलेशनमध्ये राहिल्यानंतर युएईला रवाना झाले.

वाचा-

वाचा-सा
आता नियमानुसार दुबईत पोहोचल्यानंतर सर्व खेळाडू आणि अन्य अधिकारी सहा दिवस आयसोलेशनमध्ये राहतील. या काळात त्यांची करोना चाचणी देखील होणार आहे. या काळात खेळाडूंना त्यांची रूम मधून बाहेर येण्यास परवानगी नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here