भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्टला आपली निवृत्ती जाहीर केली. पण धोनीचे करोडो चाहते आणि आजी-माजी खेळाडूंना धोनीला निवृत्तीचा सामना द्यायला हवा, असे वाटत आहे. पण निवृत्तीचा सामना जर द्यायचा असेल, तर एक संपूर्ण संघच तयार असल्याचे भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने सांगितले आहे. इरफानने यावेळी ११ खेळाडूंच्या संघाचे एक ट्विट केले आहे आणि हे ट्विट चांगलेच व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये भारताचे बरेच दिग्गज क्रिकेटचपटू निवृत्त झाले. पण या भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर वगळता अन्य कोणत्याही क्रिकेटपटूला निवृत्तीचा सामना खेळता आला नाही. राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, झहीर खान या दिग्गजांना आपली निवृत्ती मैदानात घेता आली नव्हती. त्यामुळे ज्या खेळाडंना निवृत्तीचा सामना खेळता आला नाही, त्यांच्यासाठी एक सामना खेळवावा अशई मागणी इरफानने यावेळी केली आहे.

वाचा-

इरफानने ज्या खेळाडूंना गेल्या काही वर्षात निवृत्तीचा सामना खेळायला मिळाला नाही, त्यांचा एक संघच बनवला आहे. या संघात ११ खेळाडू असून त्यांनी आतापर्यंत क्रिकेटची बरीच वर्षे सेवा केली आहे, त्यामुळे त्यांना निवृत्तीचा सामना खेळायला मिळावा, असे इरफानला वाटत आहे. त्यामुळे त्याने ११ खेळाडूंचा संघ तयार केला आहे.

इरफानने ११ माजी क्रिकेटपटूंचा एक संघ तयार केला आहे. या संघाचा निवृत्तीचा सामना विराट कोहलीच्या संघाबरोबर खेळवावा, असेही इरफानने यावेळी म्हटले आहे. त्यामुळे हा सामना खेळवला गेला तर तो भारताचा सध्याचा क्रिकेटचा संघ आणि भारताच्या माजी क्रिकेटपटूंचा संघ यांच्यामध्ये खेळवला जाऊ शकतो.

बीसीसीआयने जर हा सामना खेळवायचे ठरवले तर तो चांगला रंगतदार होऊ शकतो. कारण जे माजी खेळाडू आहेत ते अजूनही फिट दिसत आहेत. कारण यामधील काही खेळाडू अजूनही क्रिकेट खेळत आहेत, तर काही प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे हे सर्वच खेळाडू क्रिकेटच्या संपर्कात आहेत. त्यामुळे हा सामना खेळवला गेला तर त्याला चाहत्यांचाही चांगला प्रतिसाद मिळू शकतो.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here