फुटबॉलच्या सामन्यांमध्ये आपण काही वेळा चाहत्यांमध्ये झालेली मारामारी पाहतो. पण आता तर क्रिकेटमधील दोन खेळाडूंच्या चाहत्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घडना घडली आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा यांच्या चाहत्यांमध्ये महाराष्ट्रात जोरदार हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्टला आपली निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर कोल्हापुरातील कुरुंदवाड येथे धोनीच्या चाहत्यांनी सर्व ठिकाणी त्याची पोस्टर्स लावली होती. त्यानंतर काही दिवसांतच रोहित शर्माला खेल रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यानंतर रोहितच्या चाहत्यांनीही त्याची काही पोस्टर्स लावली. त्यानंतर काही जणांनी रोहितची लावलेली पोस्टर्स काढून टाकली. त्यामुळे रोहितचे चाहते चांगलेच खवळले होते.

काही अज्ञात लोकांनी रोहितचे पोस्टर्स काढले असले तरी त्याच्या चाहत्यांनी हे काम कोणी केले, हे समजले. त्यांनी धोनीच्या चाहत्यांना याबाबत जाब विचारायला सुरुवात केली आणि त्यानंतर बाचाबाची सुरु झाली. एबीपी लाइवने दिलेल्या वृत्तानुसार रोहित शर्माच्या एका चाहत्याने धोनीच्या फॅनला शिवी हासडली आणि त्यानंतर मारामारीला सुरुवात झाली.

रोहितच्या ज्या चाहत्याने शिवीगाळ केली होती त्याला उसाच्या शेतात नेण्यात आले आणि त्याच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यामुळे धोनी आणि रोहित यांच्यामध्ये जरी चांगले नाते असले तरी त्यांच्या चाहत्यांमध्ये मात्र या गोष्टीमुळे आता कटुता आल्याचे पाहायला मिळत आहे.

वीरेंद्र सेहवागने दिला सल्लाही घटना आता भारतीय क्रिकेटपटूंपर्यंत पोहोचली आहे. भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने रोहित आणि धोनी यांच्या चाहत्यांना एक सल्ला दिला आहे. सेहवागने याबाबत एक ट्विट केले आहे.

सेहवाग म्हणाला की, ” चाहत्यांनो, तुम्ही वेड्यासारखे हे प्रकार का करता. खेळाडू हे संघापुरते एकत्र असतात, पण त्यानंतर त्यांच्यामध्ये काही नाते असतेच असे नाही. काही खेळाडू मैदानाबाहेर एकमेकांशी बोलतही नाहीत. ते फक्त आपल्या कामाशी काम ठेवतात. पण हे चाहते तर वेडेच आहेत. तुम्ही अशी मारामारी करू नका, कारण भारतीय संघ हा एक आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here