अरिनाचा जन्म बेलारूसमध्ये

अरिना तिच्या खेळाव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. नुकतेच ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर तिला रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबद्दल तिचे मत विचारण्यात आले. तिचा जन्म बेलारूसमध्ये झाला असला तरी ती मियामीमध्ये राहते. बेलारूसमधील लोक तिला टायगर असेही म्हणतात.
१४० कोटींची मालकीण आहे अरिना

५ फूट ११ इंच उंची असलेली अरिना सबालेन्का टेनिस खेळते तेव्हा सेरेना विल्यम्ससारखी दिसते. त्याचबरोबर सौंदर्यात ती रशियाची माजी टेनिसपटू मारिया शारापोव्हापेक्षा कमी नाही. आतापर्यंत अरिनाकडे टेनिसमधून १३० कोटींहून अधिकची मालकी आहे.
६ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स

अरिना सबालेन्का दिसायला खूपच सुंदर आहे. यामुळेच इंस्टाग्रामवर तिचे ६ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अरिनाला प्रवासाची खूप आवड आहे. ब्रेकमध्ये ती वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत राहते.
रिलेशनशिपमुळे अधिक चर्चेत

२४ वर्षीय अरिनाचे प्रेमप्रकरणही चर्चेत राहिले आहे. ती सध्या कॉन्स्टँटिन कोल्टसोवला डेट करत आहे. कोल्टसोवसुध्दा एक खेळाडू आहे. तो आईस हॉकीशी संबंधित आहे.
कोल्टसोव १७ वर्ष मोठा कोल्टसोव १७ वर्ष मोठा

कॉन्स्टँटिन कोल्टसोव हा अरिना सबालेन्कापेक्षा १७ वर्षांनी मोठा आहे. त्याने NHL आणि हिवाळी ऑलिंपिकमध्ये आइस हॉकीमध्ये भाग घेतला आहे. दोघांनीही आपले अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
कमालीची ग्लॅमरस कमालीची ग्लॅमरस

टेनिसपटू असण्यासोबतच अरिना सबालेन्का तिच्या ग्लॅमरस लुक्ससाठीही ओळखली जाते. इंस्टाग्रामवर तिचे एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो आहेत. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर तिच्या फॉलोअर्सची संख्याही झपाट्याने वाढली.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More