नवी दिल्ली: महाराष्ट्रातील नागपूरच्या आणि तामिळनाडूच्या यांनी मिळवलेल्या महत्त्वाच्या विजयाच्या जोरावर भारताने ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाडच्या वरिष्ठ गटातील नवव्या आणि अखेऱ्या फेरीत चीनचा ४-२ने पराभव करत मोठा फेरबदल केला. बलाढ्य चीनविरुद्धच्या या निर्णायक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली ती दिव्या देशमुख आणि आर. प्रज्ञानंद यांनी. हे दोघेही २० वर्षांखालील गटातील शिलेदार आहेत.

वाचा-
आता भारतीय संग २८ ऑगस्ट रोजी क्वॉटर फायनलमध्ये खेळले. भारताने अंडर २० बोर्डवर चार ड्रॉ आणि दोन विजय मिळवले. १५ वर्षाच्या प्रागनानंदाने लियू यान याचा तर दिव्या देशमुखने जिनेर झू यांचा पराभव केला.

वाचा-
भारताची कर्णधार विदिता गुजराती आणि जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असेल्लया डिंग लिरेन यांच्यातील लढत ड्रॉ झाली तर पी हरिकृष्णाची यांग्यी यु यांच्यातील लढत ड्रॉ झाली. भारताची अव्वल महिला खेळाडू कोनेरू हम्पीने जागतिक क्रमवारीतील क्रमांक एकच्या यिफान होऊसोबतची लढत बरोबरीत सोडवली. डी हरिकाने गतविजेता वेंजुन हु विरुद्धची लढत बरोबरीत सोडवली.

भारताने ए गटात १७ गुण आणि ३९.५ बोर्ड अंक मिळवले. यामुळे उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा भारत पहिला संघ ठरला. भारतीय संघाच्या या विजायचे श्रेय प्रागनानंदा आणि दिव्या यांचे असल्याचे जगतिक क्रमवारीतील दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू हिरकृष्णाने सांगितले.

‘अ’ गटात अव्वल क्रमांक पटकावणाऱ्या भारतीय संघाची उपांत्यपूर्व फेरी २८ ऑगस्टला रंगणार आहे. तिथे भारताचा प्रतिस्पर्धी कोण असेल, ते अद्याप निश्चित झालेले नाही. चीनविरुद्धच्या लढतीत २० वर्षांखालील पूलमधील बोर्डवरील चार बरोबरी आणि दोन विजय भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरले. १५ वर्षांच्या प्रज्ञानंदने चीनच्या लि यानला नमवले. यानंतर १० आणि १२ वर्षांखालील वयोगटात माजी जगज्जेती असणाऱ्या दिव्या देशमुखने जिनेर झ्यूवर मात केली.

वाचा-
वाचा-

सामन्यांचे निकाल
सातवी फेरी : भारत वि. वि. जॉर्जिया ४-२ (आनंद बरोबरी वि. लेव्हान; हरिकृष्ण वि. वि. लुका; हम्पी बरोबरी वि. मेरी; हरिका पराभूत वि. निनो; प्रज्ञानंद वि. वि. निकोलोझी; दिव्या देशमुख वि. वि. डियाना).

आठवी फेरी : भारत वि. जर्मनी ४.५-१.५ (विदीत वि. वि. रसमस; हरिकृष्ण बरोबरी वि. माथियास; हरिका बरोबरी वि. लारा; भक्ती कुलकर्णी वि. वि. फिलिझ; निहाल बरोबरी वि. रोवेन; वंतिका वि. वि. जाना).

नववी फेरी : भारत वि. चीन ४-२. (विदीत बरोबरी वि. डिंग; हरि बरोबरी वि. यांगी; हम्पी बरोबरी वि. यिफान; हरिका बरोबरी वि. वेंजुन; प्रज्ञानंद वि. वि. यान; दिव्या देशमुख वि. वि. जिनेर).

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here