साउथम्पटन: इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने मजबूत पकड मिळवली आहे. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने ५८३ धावा केल्या. तर पाकिस्तानला पहिल्या डावात फक्त २७३ धावा करता आल्या. इंग्लंडकडून जेम्स अॅडरसनने पाच विकेट घेतल्या. पहिल्या डावात पाकिस्तान ३१० धावांनी पिछाडीवर आहे.

कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद अब्बास याची विकेट खास ठरली. विशेष म्हणजे इंग्लंडच्या खेळाडूने आधी एक सोपा सोडला आणि त्यानंतर अजब पद्धतीने फलंदाजाला रनआऊट केले. या रनआउटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-
तिसऱ्या दिवशी पाकिस्तान ८ विकेट गमावून २६१ धावांवर खेळत होता. जेम्मी अॅडरसनने चार विकेट घेतल्या होत्या. त्याला पाच विकेट घेण्यासाठी आणखी एका विकेटची गरज होती. पाकचा कर्णधार अजहर अली १२९ धावांवर खेळत असताना अॅडरसनचा चेंडू हवेत मारला. तो स्टुअर्ट ब्रॉडकडे आला. पण एक सोपा कॅच त्याच्या हातातून सुटला. तेव्ह अजहरने धाव घेण्याचा प्रयत्न केला. ब्रॉडने फलंदाजीकरणाऱ्या दिशेने चेंडू फेकला आणि तो थेट विकेटवर लागला. चेंडू विकेटला लागला तेव्हा मोहम्मद अब्बास क्रीझपर्यंत पोहोचला नव्हता. अजब पद्धतीने धाव बाद झाल्यावर अब्बासला हसू रोखता आले नाही.

वाचा-

सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ५८३ धावा केल्या. यात जॅक क्रॉलीच्या २६७ धावांच्या धमाकेदार खेळीचा समावेश होता. त्या शिवाय जॉस बटलरने १५२ धावा केल्या. उत्तरादाखल पाकिस्तानला काही खास करता आले नाही. त्याचा एकही फलंदाज मैदानावर टिकला नाही. कर्णधार अजहर अलीने नाबाद १४१ धावा केल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here