पुणे: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि अखेरचा टी-२० सामना पुण्यात होत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रात्री ७ वाजता या सामन्याला सुरूवात होईल. श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाला अनेक विक्रम करण्याची संधी आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह या दोघांवर सर्वांची नजर असेल. जाणून घेऊयात पुण्यात होणाऱ्या विक्रमांवर एक नजर…

>> लंकेविरुद्धच्या सामन्यात एक धावा केल्यानंतर विराट कोहलीच्या नावावर कर्णधार म्हणून ११ हजार धावा पूर्ण होतील. अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय आणि जगातील सहावा खेळाडू ठरले. याआधी महेंद्र सिंह धोनीने कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय सामन्यात ११ हजार २०७ धावा केल्या आहेत.

>> टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याची संधी जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह याला आहे. आजच्या सामन्यात जर त्याने एक विकेट घेतली तर बुमराह आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरले. सध्या रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहल या दोघांनी प्रत्येकी ५२ विकेट घेतल्या आहेत. बुमराहने ४४ सामन्यात ५२ विकेट घेतल्या आहेत. तो संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे. चहलने ३६ तर अश्विनने ४६ सामन्यात ५२ विकेट घेतल्या आहेत.

हे देखील वाचा-

>> भारताने श्रीलंकेविरुद्ध १२ टी-२० सामने जिंकले आहेत. एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. त्यांनी न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध प्रत्येकी १३ सामने जिंकले आहेत. भारताने लंकेशिवाय ऑस्ट्रेलियाला ११ वेळा तर बांगलादेशला १० वेळा पराभूत केले आहे.

>> टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध सलग ११ द्विपक्षीय मालिका जिंकल्या आहेत. यात टी-२०, वनडे आणि कसोटी मालिकांचा समावेश आहे. भारताने जुलै २०१२पासून लंकेविरुद्ध विजयाची मालिका सुरू ठेवली आहे. २०१२मध्ये भारताने लंकेविरुद्ध पाच सामन्यांची मालिका ४-१ने जिंकली होती. त्यानंतर भारताने त्यांच्याविरुद्ध एकही मालिका गमावलेली नाही. जर आजचा सामना भारताने जिंकला तर तो लंकेविरुद्धचा १२वा मलिका विजय असेल.

वाचा-

>> पुण्याच्या मैदानावर भारतीय संघाने टी-२०, वनडे आणि कसोटी मिळून ८ सामने खेळले आहेत. त्यापैकी ४ सामन्यात विजय तर ४ मध्ये पराभव झाला आहे.

>> टी-२०मध्ये दोन्ही संघात आतापर्यंत १८ लढती झाल्या आहेत. त्यापैकी १२ भारताने तर पाच लंकेने जिंकल्या आहेत.

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here