सौरव गांगुली एक महान कर्णधार आणि दमदार फलंदाज होते. त्यानंतर क्रिकेटच्या राजकारणातही त्याने शिरकाव केला आणि एक प्रशासक म्हणून चांगले नावही कमावले. पण आता गांगुली देशाच्या राजकारणात भारतीय जनता पार्टीकडून उतरणार असल्याचे संकेत मिळत आहे. नेमकं घडलंय तरी काय, पाहा…

गांगुली हे बीसीसीआयचे अध्यक्ष होते. एक प्रशासक म्हणून चांगले काम केल्यावर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद भूषवावे, अशी मागणीही झाली होती. पण गांगुली यांनी ही गोष्ट केली नाही. कारण त्यांना देशाच्या राजकारणात उतरायचे होते, असे समजत आहे. गांगुली यांचा बंगालमध्ये चांगला नावलौकिक आहे. अजूनही गांगुली यांच्यासाठी चाहते वेडे आहेत. या गोष्टीचाच फायदा भाजपा उचलणार असल्याचे समजते.

गांगुली यांच्यामागे भाजपा का, पाहा…बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे तृणमूल काँग्रेस पक्षाचे सरकार आहे. तृणमूल काँग्रेस हा भाजपाचा पक्का वैरी समजला जातो. पण भाजपाकडे बंगालमध्ये चांगला चेहरा नसल्याचे म्हटले जात आहे. पुढच्या वर्षी बंगालमध्ये निवडणूका होणार आहेत. त्यामुळे भाजपाला या निवडणूकीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी एक चांगला चेहरा हवा आहे. त्यासाठीच त्यांनी गांगुली यांची निवड केल्याचे म्हटले जात आहे.

गांगुलीकडून कसे मिळाले संकेत…तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यामध्ये राजकीय वैर आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. काही वर्षांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी गांगुली यांना एक जमिन दिली होती. या जमिनीवर गांगुली यांना शाळा आणि महाविद्यालय उभे करायचे होते. पण अजून या जमिनीवर काम झालेले नाही. ममत यांनी दिलेल्या जमिनीवर जर गांगुली यांनी काही काम केले तर भाजपामध्ये प्रवेश करताना ते अंगलट येऊ शकते. त्यामुळे गांगुली यांनी ही जमिन आता बंगालच्या सरकारला परत केली आहे. त्यामुळे गांगुली यांचा भाजपामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे कयास लावले जात आहेत. आतापर्यंत बऱ्याच खेळाडूंनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भारताचा माजी सलामवीर गौतम गंभीर तर सध्याच भाजपाचा खासदार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here