महाराष्ट्रातील राजकारण सध्याच्या घडीला चांगलेच तापलेले दिसत आहे. विरोधक काही प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. करोनामुळे राज्यातील चिंतेचा वातावरण कायम आहे. पण या सर्व काळात एक सकारात्मक संदेश आदित्य यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून दिलेला पाहायला मिळत आहे.
आदित्य ठाकरे हे फक्त राजकारणी नाहीत तर खेळांमध्येही त्यांना रस आहे. त्यामुळेच मुंबईच्या फुटबॉल संघटनेवरही आदित्य ठाकरे आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांचे चांगले वजन आहे. भारताच्या फुटबॉल संघटनेमध्ये उपाध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर मुंबईच्या फुटबॉल संघटनेचे अध्क्षपदही आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी भारताच्या एका विजयाची आठवण यावेळी सांगितल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर भारतीय फुटबॉल आणि फुटबॉलपटूंना ते नेहमीच मदत करत असतात. काही दिवसांपूर्वी करोनाच्या काळात एक क्रिकेटपटू मुंबईच्या विमानतळावर अकडून पडला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी धाव घेत त्याची सुटका केली होती.
भारताने आजच्याच दिवशी २०१७ साली फुटबॉलमध्ये तिरंगी चषक जिंकला होता. याबाबतचे ट्विट भारताच्या फुटबॉल संघटनेने पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये लिहिले गेले आहे की, ” आजच्याच दिवशी अर्जुन पुरस्कार विजेता संदेश झिंगानच्या नेतृत्वाखाली भारताने मुंबईमध्ये झालेली तिरंगी मालिका जिंकली होती. या मालिकेत भारताने मॉरिशिएसला पराभूत केले होते. त्याचबरोबर सेंट किंटबरोबर सामना बरोबरीत सोडवला होता आणि चषकाला गवसणी घातली होती.”
आदित्य ठाकरे यांनी हे ट्विट रीट्विट केले आहे आणि आपल म्हणणेही मांडले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, ” मला हा सामना नक्कीच आठवतो. हा सामना मुंबईमध्ये झाला होता. हा सामना पाहताना चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
A big thank you for your article.
Thank you ever so for you article post.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.