भारतीय संघ २०१९ साली झालेल्या विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यांचे आव्हान संपुष्टात आले होते. या पराभवानंतर भारतीय संघ आणि कर्णधार विराट कोहलीवर जोरदार टीकाही झाली होती.
सुनील गावस्कर यांनी याबाबत सांगितले की, ” प्रत्येक संघात ४,५ आणि सहाव्या क्रमांकावर चांगले फलंदाज असायला हवेत. कारण जेव्हा सुरुवातीचे तीन फलंदाज लवकर बाद होतात तेव्हा या फलंदाजांवर संघाच्या धावसंख्येची मोठी जबाबदारी असते. गेल्यावर्षी झालेल्या विश्वचषकात भारताकडून अशीच एक चूक झाली. ही चूक म्हणजे भारताकडे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा चांगला फलंदाज नव्हता. जर भारताकडे चौथ्या क्रमांकावर दमदार फलंदाजी करणारा खेळाडू असला असता तर हे चित्र बदलले असते.”
वाचा-
काही दिवसांपूर्वीच निवृत्ती घेणाऱ्या सुरेश रैनानेही ही गोष्ट निदर्शनास आणली होती आणि त्याने या क्रमांकावर कोणता फलंदाज असायला हवा होता, हेदेखील सांगितले होते. या विश्वचषकात भारताची फलंदाजी चांगली झाली नाही. त्यामुळे या संघात एक फलंदाज असला असता तर भारताने हा विश्वचषक जिंकला असता, असे रैना म्हणाला होता. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जर चांगली फलंदाजी झाली असती, तर हा सामना भारत जिंकू शकला असता. कारण भारताचे पहिले तीन फलंदाज झटपट बाद झाले होते. त्यामुळे भारताला पराभवाचा धक्का बसला, असे म्हटले जाते.
या विश्वचषकामध्ये अंबाती रायुडू असला असता तर भारताने विश्वचषक जिंकला असता, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने सांगितले आहे. कारण या विश्वचषकात भारताला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजांची उणीव जाणवत होती. रायुडू चौथ्या क्रमांकावर भारताकडून खेळत होता. पण त्याची निवड विश्वचषकासाठी करण्यात आली नाही. त्यामुळे भारताला चौथ्या स्थानावर नेमके कोणाला पाठवायचे, हा प्रश्न संपूर्ण स्पर्धेत जाणवला होता. त्यामुळे जर रायुडू संघात असला असता तर भारताने विश्वचषक जिंकला असता, असे रैनाने म्हटले आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
I really like and appreciate your blog post.
Thanks so much for the blog post.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.