मेलबर्न: ऑस्ट्रेलियात सध्या स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडू वगळता जगभरातील अन्य खेळाडू खेळत आहेत. जगभरातील अन्य देशातील खेळाडू स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करत आहेत. या स्पर्धेत दोनच दिवसांपूर्वी २४ तासात अफगाणिस्तानच्या राशिद खान आणि पाकिस्तानच्या हारिस राउफने हॅटट्रिक घेतली होती. स्पर्धेत गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये एका कॅचमुळे वाद झाला.

ब्रिस्बेन विरुद्धच्या सामन्यात होबार्ट हरिकेन्स संघाचा कर्णधार याचा कॅच दोन फिल्डरांनी मिळून पकडला. आता अशा प्रकारे घेतलेला कॅच नियमात बसतो का यावरून वाद सुरू झाला. अंपायरने हा कॅच बरोबर असून फलंदाजाला बाद ठरवले. सामन्यात होबार्टचा संघ प्रथम फलंदाजी करण्याासाठी मैदानात उतरला. १४व्या षटकातील चौथ्या चेंडूवर वेडने लॉन्ग ऑनवर हवेत चेंडू मारला. तेव्हा ब्रिस्बेनच्या मॅट रेनशॉने हवेत उडी घेत चेंडू पकडला. पण त्याला तोल सांभाळता आला नाही. मॅटचा पाय सीमा रेषेच्या बाहेर पडण्याआधी त्याने चेंडू हवेत उडवला. तेव्हाच सीमा रेषेवर उभा असलेला दुसरा क्षेत्ररक्षक टॉम बॅटन याने तो चेंडू कॅच केला.

वाचा-

सीमा रेषेवर नेमके काय झाले हे पाहण्यासाठी थर्ड अंपायरची मदत घेण्यात आली. बराच वेळ व्हिडिओ पाहिल्यानंतर अखेर वेडला बाद ठरवण्यात आले.

क्रिकेटमधील अशा नियमांबद्दल मला माहित नव्हते. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर केल्यानंतर त्याला अडवण्याची परवानगी आहे की नाही याची कल्पना नाही. तो अंपायरचा निर्णय आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पडण्याआधी हवेतून आत टाकल्यानंतर जर कॅच घेतला तर फलंदाज बाद होऊ शकतो, हे मला कळाल्यानंतर अंपायरचा निर्णय योग्य होता असेच म्हणावे लागेल, असे वेड म्हणाला.

सीमा रेषेवर हवेत उडी मारून चेंडू कॅच घेतला तर फलंदाज बाद होतो, हा बदल २०१७ मध्ये करण्यात आला होता. नियम १९.५ नुसार हा कॅच योग्य असल्याचे मेलबर्न क्लबने ट्वीट करत सांगितले. वेड जेव्हा बाद झाला तेव्हा त्याने ४६ चेंडूत ६१ धावा केल्या होत्या.

वाचा-

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here