आयपीएल खेळायचे, त्यामध्ये चमकदार कामगिरी करायची आणि त्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवायचे, असे स्वप्न एक खेळाडू पाहत आहे. पण फक्त आयपीएलच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळू शकते का, हा प्रश्नदेखील तेवढाच महत्वाचा आहे.

वाचा-

आयपीएल खेळून भारतीय संघातस्थान मिळवण्याचे स्वप्न भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही पाहत होता. पण धोनीने आता निवृत्ती जाहीर केली आहे, त्यामुळे त्याचे भारताकडून खेळण्याचे स्वप्नही भंगले आहे. धोनीपाठोपाठ सुरेश रैनानेही आपली निवृत्ती जाहीर केली आहे, त्यामुळे तोदेखील आता भारताकडून खेळताना दिसू शकणार नाही.

वाचा-

भारताचा या खेळाडूने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या भारतीय संघातील स्थानाबद्दल सांगितले आहे. गेल्या पाच वर्षांपासून रॉबिन उथप्पा हा भारतीय संघापासून लांब आहे. त्याला पाच वर्षात एकदाही भारताकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण या आयपीएलच्या हंगामात धडाकेबाज फलंदाजी करून तो भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आतूर आहे. यावर्षी रॉबिन हा राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळणार आहे.

याबाबत उथप्पा म्हणाला की, ” मी नेहमीच सकारात्मक विचार करत असतो. त्यामुळे यावर्षी माझ्याबाबतीत काही चांगल्या गोष्टी घडू शकतात, असे मला वाटते. जर मी यंदाच्या आयपीएलमध्ये नेत्रदीपक कामगिरी करू शकलो तर माझे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते, असे मला वाटते आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलसाठी मी जोरदार तयारी केली आहे. हे आयपीएल माझ्यासाठी सर्वात महत्वाचे असेल.”

वाचा-

यावर्षी आयपीएल युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. आयपीएलमधील सर्व संघ हे युएईमध्ये दाखल झाले आहेत. पण आयपीएलवरील संकटाचे ढग काही कमी होताना दिसत नाहीत. कारण फक्त या एका चुकीमुळे आयपीएलला मोठा धक्का बसू शकतो, असे म्हटले जात आहे. सध्याच्या करोनाच्या काळात सुरक्षितता ही सर्वात महत्वाची समजली जात आहे. आयपीएलसाठी सर्व सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर युएईमधील सर्व नियमही पाळण्यात आलेले आहेत. पण हे सर्व करून फक्त जर एक चूक झाली तर आयपीएलला धक्का बसू शकतो, असे म्हटले जात आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here