ऑस्ट्रेलियातील जंगलात काही दिवसांपासून भीषण आग लागली होती. या आगीत हजारो प्राण्यांना जीव गमवावा लागला. हजारो प्राणी जखमी झालेत. तर, अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागले. त्यांच्या मदत निधीसाठी शेन वॉर्न आपल्या ग्रीन टेस्ट कॅपचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. शेन वॉर्नने ट्विटरवर याची माहिती दिली होती. एका ऑनलाइन वेबसाइटवर या ऐतिहासिक टेस्ट कॅपचा लिलाव करण्यात आला.
वाचा-
ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज गोलंदाजाने त्याच्या करिअरमध्ये खेळलेल्या १४५ कसोटी सामन्यात ही कॅप घातली होती. कसोटी क्रिकेटमध्ये वॉर्नच्या नावावर ७०८ विकेटची नोंद आहे. कॅपच्या लिलावानंतर वॉर्नने विकत घेणाऱ्याचे आभार मानले. अशा कामासाठी सहकार्य केल्याबद्दल त्याने कॅप विकत घेणाऱ्याला धन्यवाद दिले.
वाचा-
‘ज्या सर्वांनी आज या ग्रीन टेस्ट कॅपसाठी बोली लावली त्या सर्वांचे मी आभार मानतो. ज्याने ही कॅप विकत घेतली त्यांनी दाखवलेल्या उदार मनाबद्दल मी खरच धन्यवाद देतो. कॅपला इतकी मोठी बोली लावल्यामुळे मी आनंदी आहे. माझ्या अपेक्षेपेक्षा ही रक्कम अधिक आहे. हा पैसा थेट रेड क्रॉस बुशफायरला दिला जाईल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद!’, असे वॉर्नने ट्विटवर म्हटले आहे.
वॉर्नच्या या कॅपला सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यक्तीला त्याने स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे. लिलावातून मिळालेले सर्व पैसे वॉर्न आगीमुळे नुकसान झालेल्यांना दान करणार आहे.
हे देखील वाचा- संधी
Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News