नवी दिल्ली: जगातील सर्वात वेगाने धावणारा धावपटू याची करोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. बोल्टला करोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. तरी त्याने स्वत:ला आयसोलेट केले आहे.

वाचा-
जगातील सर्वात वेगाने धावणारा आणि आठ वेळा ऑलिंपिक सुवर्ण पदक विजेता उसेन बोल्टची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. गेल्या आठवड्यात बोल्टने त्याचा ३४वा वाढदिवस जल्लोषात साजरा केला होता. या वाढदिवसाच्या पार्टीत त्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. पार्टीत मास्कचा वापर केला गेला नव्हता.

वाचा-
जमैकाच्या आरोग्य मंत्रालयाने सोमवारी रात्री उशिरा जाहीर केले की, १०० मीटर आणि २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या उसेन बोल्टला करोनाची लागण झाली आहे.

याआधी म्हणजे एक दिवस आधी सोमवारी बोल्टने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यात तो करोना चाचणीच्या रिपोर्टचा वाट पाहत असल्याचे म्हटले होते. मी सुरक्षिततेसाठी स्वत:ला क्वरंटाइन करून घेतले आहे आणि आराम करत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्याने सुरक्षित रहा माझ्या लोकांनो, असे म्हटले होते.

वाचा-
बोल्टने १०० मीटर आणि २०० मीटरमध्ये सलग ३ ऑलिंपिक स्पर्धेत (२००८, २०१२ आणि २०१६) सुवर्ण पदक जिंकले होते. त्याला करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. शनिवारी त्याचा वाढदिवस झाल्यानंतर करोनाची चाचणी घेण्यात आली होती.

अशी केली होती पार्टी, पाहा व्हिडिओ:

उसेन बोल्टने ऑलिम्पिक स्पर्धेत ८ सुवर्णपदकं मिळवली आहेत. १०० मीटर आणि २०० मीटर अंतर सर्वात वेगाने धावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. बोल्टने १०० मीटर अंतर ९.५८ सेकंदात तर २०० मीटर अंतर १९.१९ सेकंदात पार केले होते. या वर्षी मे महिन्यात बोल्टला कन्यारत्न झाली होती.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here