पहिल्या कसोटीत भारतीय संघात यशस्वी जयस्वाल आणि ईशान किशन यांनी पदार्पण केले. रोहितसोबत सलामीला आला मुंबईचा युवा फलंदाज यशस्वी. या गोष्टीला फार काळ लोटला नाही जेव्हा २१ वर्षीय यशस्वी पाणी पूरी विकून पैसे जमा करत असे. आझाद मैदानावर टेंटमध्ये तो रात्र घालवायचा. पण वेळ बदलली आणि बुधवारी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले पाऊल टाकले. सर्वांना वाटले यशस्वीचा संघर्ष संपला पण तो मैदानावर आला, पहिला स्ट्राइक घेतल्यानंतर अंपायरशी गार्ड घेतल्यानंतर त्याचा खरा संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष होता कसोटी क्रिकेटमधील पहिली धाव घेण्याचा…
वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीमध्ये अशी धार नव्हती की चे १९ वर्षाखालील भारतीय संघात आणि आयपीएलमध्ये धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या यशस्वीला अडचणीत आणतील. पण कसोटीतील पहिली धाव घेण्याचा दबाव असतोच. हा दबाव किती असतो याचे उत्तर श्रीलंकेचा माजी सलामीवीर मार्वन अटापट्टू इतके कोणीच देऊ शकणार नाही. अटापट्टूची सुरूवात भारताविरुद्ध १९९० साली झाली होती. पण पहिल्या कसोटीत दोन्ही डावात शून्यावर बाद झाल्यानंतर त्याला कसोटी संघात दोन वर्षानंतर पुन्हा संधी मिळाली. दोन वर्षांनी जेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला संधी मिळाली तेव्हा तो पुन्हा एकदा दोन्ही डावात शून्यावर बाद झाला आणि अटापट्टूला पुन्हा एकदा संघातून बाहेर करण्यात आले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दीड वर्ष चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला पुन्हा एकदा कसोटी संघात स्थान मिळाले. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या ६ पैकी ५ डावात त्याला एकही धाव करता आली नव्हती. अखेर ३ वर्षांनी संघात स्थान मिळाले आणि नंतर १० वर्ष तो नियमीतपणे संघात राहिला.
यशस्वी मैदानावर आला आणि त्याला पहिल्या ६ चेंडूवर धाव घेता आली नाही. यामुळे त्याच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नव्हता. त्यानंतर रोहित शर्माने १२ चेंडू खेळले आणि यशस्वी दुसऱ्या बाजूला वाट पाहत होता. त्यानंतर देखील यशस्वीला पहिली धाव घेण्यासाठी बरीच वाट पहावी लागली. एका बाजूला रोहितने १८ चेंडूत ११ धावा केल्या होत्या. तर यशस्वी अद्याप शून्यावरच होता. १५ चेंडू झाले तरी यशस्वीला पहिली धाव मिळाली नव्हती. अखेर १६व्या चेंडूवर त्याने हवेत अपर कट मारला आणि ४ धावा मिळाल्या. पहिली धाव घेतल्यानंतर त्याच्यावरचा दबाव कमी झाला. पुढच्या चेंडूवर त्याने एक सिंगल धावा घेतली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यशस्वीने ७३ चेंडूत ४० धावा केल्या होत्या. आतापर्यंत यशस्वीने शानदार कामगिरी केली आहे आता दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या करावी अशीच भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा असेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More