साउथम्पटन: 3rd test इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा कसोटी सामना साउथम्पटन येथे सुरू आहे. इंग्लंडने पहिल्या डावात ५८३ धावा केल्या. बदल्यात पाकिस्तानचा पहिला डाव २७३ धावांवर संपुष्ठात आला. दुसऱ्या डावात देखील पाकिस्तानची अवस्था २ बाद १०० अशी झाली आहे.

वाचा-
सामन्यात चौथ्या दिवशी इंग्लंडचे गोलंदाज आक्रमक होते. ख्रिस ब्रॉड आणि जेम्स अॅडरसन यांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना दबावात ठेवले. पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावात देखील पाकिस्तानचे फलंदाज सरेंडर करतील असे दिसते.

वाचा-
पाकिस्तानच्या दुसऱ्या डावात () ने एक शानदार चेंडू टाकला. या चेंडूवर ()ची विकेट पडली. स्टुअर्टने घेतलेल्या या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-
दुसऱ्या डावात पाकिस्तानच्या ४९ धावा झाल्या होत्या. इंग्लंडचे गोलंदाज पाकिस्तानच्या विकेट लवकर घेण्याचा प्रयत्न करत होते. स्टुअर्ट ब्रॉडने शान मसूदला एक बाहेर जाणारा चेंडू टाकला. हा चेंडू शानच्या पॅडला लागून विकेटकिपरकडे गेला. स्टुअर्टने केलेल्या अपीलवर अंपयरने शानला बाद दिले. त्यावर शानचा विश्वास बसला नाही. कारण चेंडू बाहेर जाणारा होता. त्याने लगेच डीआरएसची मागणी केली. पण जेव्हा तिसऱ्या अंपायरनी रिप्ले पाहिला त्यात चेंडू विकेटवर लागत असल्याचे दिसले. त्यामुळे तिसऱ्या अंपायरनी देखील शान मसूदला बाद दिले.

वाचा-

वाचा-
स्टुअर्ट ब्रॉडच्या या अफलातून चेंडूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पहिल्या डावात इंग्लंडच्या ५८३ धावांना उत्तर देताना पाकिस्तान फक्त २७३ धावा करू शकला आणि त्यांना फॉलोऑन टाळता आला नाही. पाकिस्तान पहिल्या डावात ३१० धावांनी पिछाडीवर होता. दुसऱ्या डावात देखील त्यांना काही खास कामगिरी करता आली नाही.

वाचा-
पाचव्या दिवशी पाकिस्तानला आणखी २१० धावा करायच्या आहेत. तर इंग्लंडला आठ विकेट घ्यायच्या आहेत. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड १-०ने आघाडीवर आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here