पुणे: भारत आणि श्रीलंका (India Vs Sri Lanka) यांच्यातील तिसरा आणि अखेरचा टी-२० सामना आज पुण्यात होणार आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पुण्यातील सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाचा मालिका जिंकण्याचा प्रयत्न असेल. जर लंकेने हा सामना जिंकला तर मालिका १-१ अशी बरोबरीत सुटले. मालिकेतील गुवाहाटी येथील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर इंदूर येथील सामना भारताने ७ विकेटनी जिंकला.

वाचा-

हवामान आणि खेळपट्टी

पुण्यात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. पण हवामान विभागाने पावसाची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. किमान तापमान १६ डिग्री असेल जे नियमीत तापमानापेक्षा ४ डिग्रीने अधिक आहे. असे वातावरण क्रिकेटसाठी आदर्श मानले जाते. खेळपट्टीचा विचार केल्यास पुण्यातील खेळपट्टी ही फलंदाजीसाठी उत्तम असेल. पण ती पूर्ण फ्लॅट देखील नसेल. त्यामुळे गोलंदाजांना देखील चांगली कामगिरी करण्याची संधी आहे.

असे आहे टीम इंडियाचे पुण्यातील रेकॉर्ड

भारतीय संघाने पुण्यात दोन टी-२० सामने खेळले आहेत. त्यापैकी पहिला सामना २० डिसेंबर २०१२ रोजी इंग्लंडविरुद्ध झाला होता. या सामन्यात भारताने ५ विकेटनी विजय मिळवला होता. तर ९ फेब्रुवारी २०१६ रोजी लंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताचा ५ विकेटनी पराभव झाला होता. लंकेने पुण्यात एकच सामना खेळला असून त्यात त्यांनी विजय मिळवला.

वाचा-

आयसीसी क्रमवारीत भारत पाचव्या स्थानावर असून श्रीलंका सातव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघात आतापर्यंत १८ टी-२० सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने १२ तर लंकेने ५ सामन्यात विजय मिळवला आहे. एका सामन्याचा निकाल लागला नाही.

हे देखील वाचा- धी

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here