नवी दिल्ली: जमैकाचा धावपटू याच्या वाढदिवसाच्या पार्टीनंतर त्याची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या पार्टीत वेस्ट इंडिजा क्रिकेटपटू देखील होता. गेल येत्या काही दिवसात आयपीएलमध्ये खेळता दिसणार आहे. त्यामुळेच सर्वांची काळजी वाढली होती. आता गेलच्या चाचणीचा रिपोर्ट आला आहे.

वाचा-
जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टचा वाढदिवस २१ ऑगस्ट रोजी झाला. या निमित्ताने आयोजित केलेल्या पार्टीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाही, तसेच कोणीही मास्कचा वापर देखील केला नव्हता. पार्टी झाल्यानंतर बोल्टची करोना चाचणी घेण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह आली. बोल्टने स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले आहे.

वाचा-
बोल्टच्या पार्टीत गेल देखील उपस्थित होता. यामुळे गेल देखील करोना होण्याची शक्यता होती. आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी युएईला निघण्याआधी गेलने करोना चाचणी केली. त्याचा रिपोर्ट नेगेटिव्ह आला आहे. स्वत: गेलेने इस्टाग्रामवर ही माहिती दिली.

वाचा-

आयपीएलमध्ये गेल किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळतो. यावेळी केएल राहुल या संघाचा कर्णधार आहे. गेलने २०१९च्या आयपीएलमध्ये ३६८ धावा केल्या होत्या. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १२५ सामन्यात ४ हजार ४८४ धावा केल्या आहेत. यात ६ शतक आणि २८ अर्धशतकांचा समावेश आहे.

वाचा-
आयपीएलमधील सर्वात मोठी खेळीचा विक्रम देखील गेलच्या नावावर आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूकडून खेळताना नाबाद १७५ धावा केल्या होत्या. गेलने तेव्हा ६६ चेंडूत १३ चौकार आणि १७ षटकार मारले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

6 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here