सुशांतसिंगच्या प्रकरणाचा तपास सुरुवातीला मुंबई पोलिस करत होती. त्यानंतर बिहार पोलिसांकडे सुशांतसिंगच्या वडिलांनी तक्रार नोंदवली आणि तिथल्या पोलिसांनी तपास सुरु केला. पण यामध्ये शह-काटशह होत होते. त्यामुळे काही जणांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.
सुशांतसिंगच्या मृत्यूचे गूढ अजूनही उकलेले नाही. कारण सुशांतसिंगने आत्महत्या केली असे म्हटले जात असले तरी काही जणांनी त्याची हत्या केली, असे म्हटले आहे. पण सुशांतसिंगचा मृत्यू नेमका कसा झाला, याचा तपास अजूनही सुरु आहे.
नुकतीच निवृत्ती पत्करलेल्या सुरेश रैनालाही सुशांतसिंगच्या मृत्यूचा धक्का बसला. पण तो यामधून आता सावरला असून त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये रैनाने सुशांतसिंगचा एक फोटोही ठेवला आहे. या व्हिडीओमध्ये रैना सुशांतसिंगबद्दल म्हणाला की, ” सुशांतसिंग, तु नेहमीच आमच्या आठवणीत राहशील. चाहतेही तुझी आठवण काढत राहतील. मला आपल्या सरकारवर विश्वास आहे आणि नेतेमंडळी तुला न्याय मिळवून देतील, असेही मला वाटते. तु आम्हा सर्वांसाठीच प्रेरणास्थान राहशील.”
सुशांतसिंगच्या मृत्यूनंतर फक्त बॉलीवूडच हादरले नाही तर क्रीडा क्षेत्रालाही याचा धक्का बसला. कारण सुशांतसिंग हा काही खेळाडूंचाही मित्र होता. त्यामुळे खेळाडू अजूनही सुशांतसिंगच्या मृत्यूच्या धक्क्यातून बाहेर आलेले नाही. सुशांतसिंगने भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या कारकिर्दीवर एक सिनेमाही केला होता. त्यामुळे सुशांत हा काही क्रिकेटपटूंच्या जवळ गेला होता आणि त्यांच्यामधअये चांगलेच मैत्रीचे नाते निर्माण झाले होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
A big thank you for your article.
Thank you ever so for you article post.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.