वेगाचा अनभिषिक्त सम्राट अशी बिरुदावली मिरवणाऱ्या उसेन बोल्टचा २१ ऑगस्टला वाढदिवस होता. त्यासाठी त्याने एक पार्टी दिली होती आणि या पार्टीमध्ये सर्व नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. त्यामुळे बोल्टला करोना झाल्याचे आता निष्पन्न झाले आहे. या पार्टीमध्ये धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलही होता. त्यामुळे गेलची कराना चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर आपण आयपीएल खेळणार की नाही, याचा खुलासा दस्तुरखुद्द गेलने केला आहे.

या सर्व प्रकारानंतर गेलचीही करोना चाचणी करण्यात आली. पण त्यानंतर गेल धास्तावलेला पाहायला मिळत आहे. कारण गेलने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये करोनामुळे या वर्षी आपण काय करणार आणि काय नाही, याबाबतचा खुलासा गेलने केल्याचे पाहायला मिळत आहे.

गेलने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ” माझी करोनाची चाचणी करण्यात आली आहे आणि ती निगेटीव्ह आली आहे. पण मी आता २०२० या वर्षात घरीच राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी कुठेही प्रवास करणार नाही. त्यामुळे चाहत्यांनो मला माफ करा…” गेलने ही पोस्ट करत सर्वांनाच संकेत दिले आहेत. गेलच्या म्हणण्यानुसार जर तो या वर्षात कुठेही प्रवास करणार नसेल तर तो आयपीएलही खेळू शकणार नाही. त्यामुळे या वर्षीच्या आयपीएलमध्ये गेलची धडाकेबाज फलंदाजी पाहायला मिळणार नाही, असे म्हटले जात आहे.

जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टचा वाढदिवस २१ ऑगस्ट रोजी झाला. या निमित्ताने आयोजित केलेल्या पार्टीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाही, तसेच कोणीही मास्कचा वापर देखील केला नव्हता. पार्टी झाल्यानंतर बोल्टची करोना चाचणी घेण्यात आली आणि ती पॉझिटिव्ह आली. बोल्टने स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले आहे. बोल्टच्या पार्टीत गेल देखील उपस्थित होता. यामुळे गेल देखील करोना होण्याची शक्यता होती. त्यामुळे गेलने करोना चाचणी केली. त्याचा रिपोर्ट नेगेटिव्ह आला आहे. स्वत: गेलेने इस्टाग्रामवर ही माहिती दिली होती. पण त्यानंतर गेलने अजून एक पोस्ट करत आपण यावर्षी कुठेही प्रवास करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here