करोनाच्या काळातही आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स या संघाला नवा प्रशिक्षक मिळाला आहे. काही वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेल्या या माजी खेळाडूकडे आता दिल्लीच्या संघाची प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे.

वाचा-

दिल्लीच्या संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही. दिल्लीच्या संघाची आतापर्यंत चांगली कामगिरी झालेली नाही. त्यामुळे आता या नवीन प्रशिक्षकाच्या येण्यामुळे दिल्लीची कामगिरी सुधारणार का आणि ते जेतेपद पटकावणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

वाचा-

यापूर्वी दिल्लीच्या संघामध्ये गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका ऑस्ट्रेलियाचा जेम्स होप्स निभावत होता. पण काही कारणास्तव तो या वर्षी दिल्लीच्या संघाबरोबर नसणार आहे. त्यामुळे आता ही जबाबदारी ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज रायन हॅरिसकडे सोपवण्यात आली आहे. आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स या संघाने २००९ साली आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. या संघात हॅरिसचा समावेश होता. त्यानंतर हॅरिस हा किंग्स इलेव्हन पंजाब या संघाकडून खेळत होता.

हॅरिसने १३३ एकदिवसीय आणि ४४ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यानंतर हॅरिसने २०१५ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. दिल्लीच्या मुख्य प्रशिक्षकपदी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आहे. हॅरिसची नियुक्ती ही पॉन्टिंगमुळेच झाल्याचे काही जण म्हणत आहेत.

वाचा-

यावर्षी आयपीएल ही युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. आयपीएल खेळण्यासाठी सर्व संघ युएईमध्ये दाखल झाले आहे. सध्याच्या घडीला खेळाडू क्वारंटाईनमध्ये आहेत. काही दिवसांनी या सर्व खेळाडूंची करोना चाचणी घेण्यात येणार आहे. खेळाडू जर करोना चाचणीत निगेटीव्ह सापडले तरच त्यांना सराव करता येणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here