आता काही दिवसांमध्ये आयपीएलला सुरुवात होणार आहे. त्यासाठी आयपीएलची मैदानंही सज्ज करण्यात आलेली आहे. आयपीएलचे यावेळी सामने नेमक्या कोणत्या मैदानावर खेळवण्यात येणार, हे आता निश्चित करण्यात आले आहे.

वाचा-

यावर्षी आयपीएल ही युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. आयपीएल खेळण्यासाठी सर्व संघ युएईमध्ये दाखल झाले आहे. पण कोणत्याही संघाने अजूनपर्यंत सराव सुरु केलेला नाही. पण युएईमधील मैदानं मात्र सज्ज झालेली आहेत. काही दिवसांतच या मैदानात आयपीएलमधील खेळाडू सराव करताना दिसतील. पण यावर्षीची आयपीएल होणार तरी कोणत्या स्टेडियम्समध्ये, पाहा…

युएईमध्ये तीन मोठी स्टेडियम्स आहेत. या तीन स्टेडियम्समध्येच आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. आतापर्यंत या मैदानात काही आंतरराष्ट्रीय सामनेही झालेले आहेत. त्यामुळे खेळाडूंना ही मैदानं नवीन नाहीत. त्यामुळे आता या आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पडणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

वाचा-

आयपीएलसाठी तयार करण्यात आलेले पहिले स्टेडियम आहे, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम. या स्टेडियममध्ये पहिला सामना २००९ साली खेळवण्यात आला होता. हा सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झाला होता. गेल्यावर्षीपर्यंत या स्टेडियममध्ये सामने झाले आहेत. या वर्षी आयपीएलच्या सामन्यांनी या स्टेडियममध्ये पहिल्यांदा सामने होतील.

वाचा-

आयपीएलसाठी दुसरे स्टेडियम आहे, शाहजा क्रिकेट स्टेडियम. आतापर्यंत या स्टेडियममध्ये २४० आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. त्याचबरोबर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही या स्टेडियमचे नाव आहे. २०१४ साली आयपीएलचे काही सामने या स्टेडियममध्ये खेळवले गेले होते. आयपीएलसाठी तिसरे स्टेडियम असेल ते, शेख झायेद क्रिकेट स्टेडियम. युएईमधील सर्वात जास्त पसंती या स्टेडियमला दिली जाते, असेही म्हटले जाते.

वाचा-

आयपीएलमधील सर्व संघ युएईला पोहोचले आहेत आणि सध्याच्या घडीला खेळाडू क्वारंटाईनमध्ये आहेत. काही दिवसांनी या सर्व खेळाडूंची करोना चाचणी घेण्यात येणार आहे. खेळाडू जर करोना चाचणीत निगेटीव्ह सापडले तरच त्यांना सराव करता येणार आहे. यावेळी खेळाडूंना बायो-बबल या तंत्रज्ञानाचा वापर करून ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे खेळाडूंना करोनाचा धोका कमी होईल, असे म्हटले जात आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here