सचिनविरुद्ध असा होता डाव..

सचिनविरुद्ध असा होता डाव..

कारण सचिनला लवकर बाद केले की, भारताला पराभूत करणे सोपे होईल अशी त्याची धारणा होती. त्यामुळे नासिरने संघातील फिरकी पटी अॅश्ले जाईल्सला साथीला घेत एक रणनिती आखली होती. सचिन काही आपली विकेट बहाल करण्यापैकी नक्कीच नाही. त्यामुळे सचिनला मानसीक त्रास देऊन त्याला लवकर बाद करता येईल, हे नासिर पाहत होता. ​​​त्यावेळी नासिरने जाइल्सला सचिनच्या लेग स्टम्पच्या बाहेर चेंडू टाकण्यास सांगितले होते, जेणेकरून सचिनला फटकेच मारता येणार नाही.

सेहवागला पडला होता मोठा प्रश्न…

सेहवागला पडला होता मोठा प्रश्न...

​सचिनला ​​​​​फटके मारता आले नाहीत तर त्याच्या धावा आटतील आणि त्यानंतर निराशेच्या भरता तो बाद होईल, असे नासिरला वाटत होते. ​​फटके मारता आल्या नाहीत तर त्याच्या धावा आटतील आणि त्यानंतर निराशेच्या भरता तो बाद होईल, असे नासिरला वाटत होते. ​​ पण सचिन मात्र अजिबात निराश झाला नव्हता. तो जाइल्सचा समर्थपणे सामना करत होता. पण त्यावेळी सेहवाग मात्र सचिन फटके का मारत नाही, हा प्रश्न त्याला पडला होता.

सचिनचा तोल गेला अन्…

सचिनचा तोल गेला अन्...

​​​​सेहवाग एकदा सचिनकडे गेला आणि त्याला म्हणाला की, ” चेंडू काही जास्त वळत नाही, त्यामुळे तुम्ही पुढे येऊन फटके मारू शकता.” यावर सचिन काहीच बोलला नाही. उलट सचिनने सेहवागकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर सेहवाग काही थांबला नाही. त्याने ३०४ वेळा सचिनला हीच गोष्ट सांगितली. त्यामुळे कदाचित सचिनचे मन बदलले असावे, असे पाहायला मिळाले. कारण त्यानंतर सचिनने जाइल्सच्या गोलंदाजीवर संयमीपणे खेळण्याचे सोडले आणि तो क्रिझ सोडून पुढे आला

सचिनला बसला मोठा फटका…

सचिनला बसला मोठा फटका...

​सचिन आता पुढे येऊन मोठा फटका मारणार, असे सर्वांनाच वाटत होते. कारण यापूर्वी जाइल्सचे चेंडू वळत नसल्यचाे पाहायला मिळत होते. पण यावेळी मात्र चेंडू चांगलाच वळाला. त्यामुळे या चेंडूवर सचिनचा अंदाच चुकला. त्यामुळे हा चेंडू सचिनला आपल्या बॅटवर घेता आला नाही आणि तो चेंडू थेट यष्टीरक्षकाकडे गेला. यष्टीरक्षकाने कोणतीही चूक केली नाही आणि त्याने सचिनला बाद केले. सचिन त्यावेळी ९० धावांवर खेळत होता. त्यामुळे १० धावांनी त्याचे शतक हुकले होते. सचिन जेव्हा बाद झाला तेव्हा सेहवागला मोठा धक्का बसला.

सेहवागचे सचिनकडे पाहायचे धाडस झाले नाही…

सेहवागचे सचिनकडे पाहायचे धाडस झाले नाही...

सचिनकडे पाहायचे धाडस त्याचे झाले नव्हते. पण सचिन रागावलेला असणार आणि आता आपले खरे नाही, हे सेहवागला समजले. सचिन बाद होऊन पेव्हेलियनमध्ये गेला होता. त्यानंतर काही काळात सेहवागही मैदानाबाहेर आला. त्यावेळी सेहवागला पेव्हेलियनमध्ये जायचे होते. पण सचिनच्या रागाला घाबरून तो पेव्हेलियनमध्ये जात नव्हता. कारण सचिन शतकासमीप आला होता आणि तो माझ्यामुळे बाद झाला, अशी सल सेहवागच्या मनात होतीच. पण सचिन आता आपल्यावर रागावलेला असेल आणि या परिस्थितीत त्याच्यापुढे आपण जाऊ नये असे सेहवागला वाटले. त्यामुळे तो ड्रेसिंग रुममध्ये जात नव्हता

सेहवाग ड्रेसिंग रुममध्ये जायला घाबरला होता, कारण…

सेहवाग ड्रेसिंग रुममध्ये जायला घाबरला होता, कारण...

​सेहवाग हा ड्रेसिंग रुममध्ये का येत नाही, हा प्रश्न सचिनला पडला होता. त्यावेळी कोणीतरी ही गोष्ट सचिनला सांगितली. त्यावेळी सचिननने सेहवागला ड्रेसिंग रुममध्ये येणार सांगितले. त्यानंतरच सेहवागचे ड्रेसिंग रुममध्ये जायचे धाडस झाले होते. कारण सचिन हा स्वभावाने शांत असला तरी त्याचा राग फार जास्त असतो, हे यापूर्वी ऐकायला मिळाले होते आणि सेहवागला भडकलेल्या सचिनपुढे जाण्याची तयारी नव्हती. पण अखेर तो सचिनच्या सांगण्यावरून ड्रेसिंग रुममध्ये गेला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here