दुबई: गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेली प्रतिक्षा अखेर संपली आहे. आशिया क्रिकेट काउंसिलने आशिया कप २०२३च्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. वनडे फॉर्मेटमधील ही स्पर्धा या वर्षी पाकिस्तान आणि श्रीलंकेत होणार आहे. ३० ऑगस्ट रोजी स्पर्धेतील पहिली मॅच पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होतील. तर १७ सप्टेंबर रोजी कोलंबो येथे फायनल मॅच होईल. स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ असे ६ संघ असून एकूण १३ लढती होणार आहे.

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत. या शिवाय नेपाळ हा तिसरा संघ आहे. ग्रुप ब मध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे ३ संघ आहेत. सर्व संघ ग्रुपमधील संघासोबत प्रत्येकी एक मॅच खेळतील. ग्रुपमधईल टॉपचे २ संघ सुपर- ४ मध्ये पोहोचतील. सुपर-४ फेरीतील दोन संघात अंतिम मॅच होतील. यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात जास्तीत जास्त ३ मॅच होऊ शकतात.

उस्मानाबादच्या राजवर्धन हंगर्गेकरने पाकिस्तानला हादरवले; वादळी गोलंदाजीने फलंदाजांनी हात जोडले
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ग्रुप फेरीतील मॅच २ सप्टेंबर रोजी होणार आहे. भारताची स्पर्धेतील ही पहिली मॅच असेल. तर ४ सप्टेंबर रोजी भारत आणि नेपाळ यांच्यात लढत होईल. जर भारत आणि पाकिस्तान सुपर-४ मध्ये पोहोचले तर या दोन्ही देशात पुन्हा एक लढत पाहायला मिळाले. ही लढत १० सप्टेंबर रोजी कोलंबोत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन्ही संघ फायनलमध्ये पोहोचले तर १७ सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान अशी अंतिम लढत पाहायला मिळू शकते.

आशिया कप २०२३ मधील ४ लढती पाकिस्तानमध्ये होतील तर ९ लढती श्रीलंकेत होणार आहेत.

स्पर्धेचे वेळापत्रक

ग्रुप फेरी

३० ऑगस्ट- पाकिस्तान विरुद्ध नेपाळ
३१ ऑगस्ट- बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
०२ सप्टेंबर- पाकिस्तान विरुद्ध भारत
०३ सप्टेंबर- बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
०४ सप्टेंबर- भारत विरुद्ध नेपाळ
०५ सप्टेंबर- अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका

सुपर -४ फेरी

०६ सप्टेंबर- ए १ विरुद्ध बी २
०९ सप्टेंबर- बी १ विरुद्ध बी २
१० सप्टेंबर- ए १ विरुद्ध ए २
१२ सप्टेंबर-ए २ विरुद्ध बी १
१४ सप्टेंबर-ए १ विरुद्ध बी १
१५ सप्टेंबर- ए २ विरुद्ध बी २

फायनल
१७ सप्टेंबर- सुपर फेरीतील नंबर १ विरुद्ध नंबर २

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here