केप टाउन: हा जेन्टलमन गेम मानला जातो. पण क्रिकेटच्या मैदानावर अशा अनेक घटना होतात ज्यामुळे या जेन्टलमन गेमच्या प्रतिमेला तडा जातो. अशीच एक घटना पुन्हा एकदा घडली आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात जेन्टलमन गेम बदनाम झाला.

आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने १८९ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत विजय जरी मिळवला असला तरी एका खेळाडूच्या वर्तनामुळे त्यांच्या विजयाला गालबोट लागले. इंग्लंडचा विकेटकीपर याने आफ्रिकाचा अष्टपैलू वर्नान फिलेंडरला अपशब्द वापरले.

वाचा-

केप टाउन कसोटीच्या अखेरच्या दिवशी आफ्रिका ४३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होती तेव्हा फलंदाजी करणाऱ्या फिलेंडरला उद्देशून विकेटकीपर बटलरने अपशब्द वापरले. बटलर जे काही बोलला ते स्टंपमधील माइकमध्ये रेकॉर्ड झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी बटलरच्या या वर्तनावर जोरदार टीका केली.

या घटनेची दखल आयसीसीने घेतली असून बटलरवर प्लेअर कोड ऑफ कंडक्ट आर्टिकल २.३ नुसार अश्लील शब्द वापरल्याबद्दल दंड करण्यात आला आहे. एखाद्या खेळाडूचा वैयक्तीक अपमान केल्याबद्दल बटलरला १५ टक्के दंड करण्यात आला आहे. तसेच त्याला एक नकारात्मक गुण देखील देण्यात आला.

वाचा-

आफ्रिकेचा जलद गोलंदाज डेल स्टेनने या प्रकरणी बटलरवर टीका केली. तर इंग्लंडचा कर्णधार जो रुटने वाद टाळण्याचा प्रयत्न केला. जे काही झाले ते फार गंभीर नव्हते. दोन्ही खेळाडू जिंकण्यासाठी कसोटी खेळत होते. हे सर्व खेळ भावनेशी निगडीत आहे आणि तुम्हाला देखील टीव्हीवर थोडा मसाला हवा असतो ना?, असे रुट म्हणाला.

हे देखील वाचा-धी

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here