मुंबई: भारतीय कसोटी संघाचा उप कर्णधार () याने शुक्रवारी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोसोबत अंजिक्यने सर्वांना एक प्रश्न देखील विचारला आणि त्यावर क्रिकेट चाहत्यांसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने () देखील उत्तर दिले. अजिंक्यची ही पोस्ट आणि सचिनचे उत्तर आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अजिंक्यने शुक्रवारी सर्व सामान्यांचा आवडता पदार्थ वडा पावसह (Vada Paav) स्वत:चा एक फोटो ट्विट केला. हा फोटो शेअर करताना त्याने विचारले की तुम्हाला कशा सोबत खाण्यासाठी आवडतो? या प्रश्नाखाली अजिंक्यने तीन पर्याय देखील दिले आहेत. चहा सोबत, चटणी सोबत की फक्त वडा पाव.

वाचा-

अजिंक्यच्या या प्रश्नावर अनेक नेटिझन्सनी उत्तर दिले. या उत्तरांमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या उत्तराची. सचिनने अजिंक्यच्या पोस्टला उत्तर म्हटले की, मला लाल चटणी सोबत वडा पाव आवडतो. त्यासोबत थोडी हिरवी चटणी आणि थोडी गोड चटणी असेल तर अधिक चांगली चव येते.
वाचा-

आता खुद्द सचिनने उत्तर दिले म्हटल्यावर अंजिक्यने देखील Great combination paaji अशी प्रतिक्रिया दिली.

वडा पाव हा आपला आवडता पदार्थ आहे हे सचिनने सांगण्याची पहिली वेळ नाही. याआधी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सचिनने वडा पाव हा आवडता पदार्थ असल्याचे म्हटले होते. मुलगा अर्जुन सोबत शिवाजी पार्क जिमखान्यावर वडा पाव खाण्यात आवडत असल्याचे सचिनने सांगितले होते.

हे देखील वाचा-

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here