वाचा-
करोनामुळे क्रिकेटचे मोठे नुकसान झालेले आहे. अजूनही क्रिकेट पूर्वपदावर आलेले नाही. पण तरीही करोनाविरोधातील लढ्यासाठी क्रिकेट सज्ज झालेले पाहायला मिळत आहे. काही देशांमध्ये आता क्रिकेटला सुरुवात झाली आहे. पण फक्त क्रिकेट सामने सुरु करण्यात आलेले नाहीत. तर या सामन्यांच्या मदतीने करोनाविरोधातील मोहिमेला आर्थिक पाठबळही दिले जाणार आहे.
वाचा-
करोनाच्या काळात कॅरेबियन प्रीमिअर लीग सुरु करण्यात आली आहे. या लीगमध्ये प्रत्येक षटकाराला साडे तीन हजार रुपये देण्यात येणार आहे. ही रक्कम करोनाविरोधातील मोहिमेला देण्यात येणार आहे. आतापर्यंत कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये १० सामने खेळवले गेले आहेत. या १० सामन्यांमध्ये ११५ षटकार लगावले गेले आहेत. याचाच अर्थ आतापर्यंत ४ लाख २७ हजार ३९३ एवढी रक्कम करोनाविरोधातील मोहिमेला देण्यात आली आहे. आता अजून कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये २३ सामने शिल्लक असून यामधून किती रक्कम करोनाविरोधातील मोहिमेला देण्यात येते, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times