आजच्या दिवशी म्हणजे १० जानेवारी १९८५ रोजी रवी शास्त्री यांनी एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स मारले होते. तेव्हा अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय फलंदाज ठरले होते. जागतिक क्रिकेटमध्ये रवी शास्त्रींच्या आधी अशी कामगिरी वेस्ट इंडिजच्या () यांनी केली होती. सोबर्स यांनी १९६८मध्ये सहा चेंडूत सहा षटकार मारले होते.
वाचा-
रवी शास्त्री यांनी रणजी ट्रॉफी स्पर्धेत बडोदराचा गोलंदाज तिलक राज याच्या एकाच षटकात सहा सिक्स मारले होते. या सामन्यात रवी शास्त्रींनी १२३ चेंडूत द्विशतक झळकावले होते. तेव्हा शास्त्रींचे द्विशतक सर्वात जलद द्विशतक ठरले होते. या खेळीत त्यांनी १३ चौकार आणि १३ षटकार मारले होते.
वाचा-
शास्त्रींनी मारलेल्या सहा षटकारानंतर २००७मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्सने आणि युवराज सिंगने आफ्रिकेत झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये अशी कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी सर्व प्रथम गिब्सने केली. त्यानंतर आठ वर्षांनी २०१५मध्ये इंग्लंडच्या अॅलेक्स हेल्सने काऊंटी क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा सिक्स मारले.
वाचा-
२०१८मध्ये अफगाणिस्तानच्या हजरातुल्ला जजईने अफगाणिस्तान प्रीमिअर लीग स्पर्धेत सहा चेंडूत सहा षटकार मारले. त्यानंतर पाच जानेवारी न्यूझीलंडच्या लिओ कार्टने सुपर स्मॅश स्पर्धेत एकाच षटकात सहा सिक्स मारण्याचा पराक्रम केला.
Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News