रन मशिन अशी ओळख असलेल्या विराटने वनडेत आतापर्यंत १२ हजार ८९८ धावा केल्या आहेत. त्याला १३ हजार धावा करण्यासाठी आणखी फक्त १०२ धावांची गरज आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ३ वनडेत जर त्याने १०२ धावा केल्या तर वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगाने १३ हजार धावांचा टप्पा पार करणारा तो फलंदाज ठरले. सध्या हा विक्रम मास्टर ब्रास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.
सचिनने वनडेतील ३२१ डावात १३ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. जर विराटने ३ डावात १०२ धावा केल्या तर त्याच्या फक्त २६८ डावात १३ हजार धावा होतील. डावांचा विचार करता सर्वात वेगाने १३ हजार धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रम विराटच्या नावावर होईल.
विराटने वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये ९ शतक केली आहेत. भारताकडून वनडेत वेस्ट इंडिजविरुद्धची ही सर्वाधिक शतकांची कामगिरी आहे. विराटने श्रीलंकेविरुद्ध वनडेत १० शतक केली आहेत. जर वनडे मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने आणखी एक शतक केले तर त्याच्या शतकांची संख्या १० होईल. सध्या वनडेत कोणत्याही संघाविरुद्ध सर्वाधिक शतकांचा विक्रम विराटच्या नावावर आहे. वनडेत त्याने एकूण ४६ शतक केली आहेत.
वनडेत सर्वात वेगाने १३ हजार धावांचा टप्पा पार करणारे फलंदाज
सचिन तेंडुलकर- ३२१ डाव
रिकी पॉन्टिंग- ३४१ डाव
कुमार संगकारा- ३६३ डाव
सनथ जयसूर्या- ४१६ डाव
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे मालिका वेळापत्रक
पहिली वनडे मॅच- २७ जुलै
दुसरी वनडे मॅच- २९ जुलै
तिसरी वनडे मॅच- ०१ ऑगस्ट
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More