बारबाडोस: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज दुसरी वनडे मॅच होणार आहे. भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून आजच्या लढती विजय मिळून भारत मालिकेत २-० अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. भारताने २००६ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये वनडे मालिकेत १-४ असा पराभव स्विकारला होता. त्यानंतर टीम इंडियाने एकही वनडे मालिका गमावली नाही. २००६ नंतर झालेल्या सर्व ९ मालिकेत भारताने विजय मिळवला आहे. पहिल्या वनडेत सहज विजय मिळवणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंकडे तीन मोठे विक्रम करण्याची संधी आहे.

रोहित आणि विराट

भारताचा कर्णधार आणि माजी कर्णधार यांनी आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये एकूण ८५ वेळा एकत्र फलंदाजी केली आहे. या दरम्यान त्यांनी ४ हजार ९९८ वेळा भागिदारी केली आहे. आजच्या लढतीत या दोघांनी मिळून २ धावा केल्या तर त्यांच्या भागिदारीच्या ५ हजार धावा होतील. अशी कामगिरी करणारी ही जगातील ८वी जोडी असेल.

विराट कोहलीच्या १३ हजार धावा

माजी कर्णधार विराट कोहलीला पहिल्या वनडेत फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. आता दुसऱ्या वनडेत जो फलंदाजीला आला आणि शतकी खेळी केली तर त्याच्या वनडेत १३ हजार धावा पूर्ण होतील. अशी कामगिरी करणारा तो भारताचा फक्त दुसरा जर जगातील पाचवा फलंदाज होईल. इतक नाही तर विराटने ही कामगिरी केली तर सर्वात वेगाने १३ हजार धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल.

रियान परागकडून ट्रोल करणाऱ्यांना चपराक; वादळी शतकानंतर घेतल्या इतक्या विकेट, षटकारांची संख्या…
जडेजाला विक्रमाची संधी

वेस्ट इंडिजविरुद्ध रविंद्र जडेजाने ३० वनडेत ४४ विकेट घेतल्या आहेत. या दोन्ही देशातील लढतीत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे. या बाबत त्याने वेस्ट इंडिजचे महान गोलंदाज कर्टनी वॉल्श यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. वॉल्श यांनी ३८ सामन्यात ४४ विकेट घेतल्या होत्या.जडेजाने गेल्या सामन्यात ३ विकेट घेतल्या होत्या. आज जर अशी कामगिरी त्याने पुन्हा केली तर दोन्ही देशातील लढतीमधील सर्वात यशस्वी गोलंदाज होण्याची त्याला संधी आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here