नवी दिल्ली: आयपीएल प्रमाणे सध्या अमेरिकेत मेजर लीग क्रिकेट सुरू आहे. या स्पर्धेत चॅलेंजरची लढत एमआय न्यूयॉर्कची लढत टेक्सास सुपर किंग्ज विरुद्ध झाली. आयपीएलमधील दोन यशस्वी संघ असलेल्या या संघात अमेरिकेत झालेली लढत देखील चुरशीची झाली. यात एमआय न्यूयॉर्कने ६ विकेटनी विजय मिळवला. मुंबई इंडियन्सकडून टिम डेव्हिड आणि डेवाल्ड ब्रेविस यांनी वादळी फलंदाजी केली. या विजयासह मुंबईने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार निकोलस पूरनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टेक्सास सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना २० बाद १५८ धावा केल्या. टेक्सासकडून डिवॉन कॉनवेने सर्वाधिक ३८ धावा केल्या. तर मिलिंद कुमारने ३७ धावांची खेळी केली. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने ४ विकेट तर टिम डेव्हिडने २ विकेट घेतल्या. एहसान आदिल आणि राशिद खान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.
विजयासाठी १५९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात फार चांगली झाली नाही. ५० धावांच्या आत त्यांनी दोन विकेट गमावल्या होत्या. सामना मुंबईच्या हातातून जाईल असे वाटत असताना डेवाल्ड ब्रेविस आणि टिम डेव्हिड यांनी सूत्रे हाती घेतली. ब्रेविसने २ षटकार आणि १ चौकारांसह नाबाद ४१ धावा केल्या तर डेव्रिडने ४ षटकारांसह २० चेंडूत नाबाद ३३ धावा केल्या. या दोघांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर मुंबईने लढत १९व्या षटकात जिंकली.

WI vs IND: वनडे क्रिकेटमध्ये आज होणार ३ विक्रम; रोहित-विराट-जडेजा यांना मोठे रेकॉर्ड करण्याची संधी
आता चॅम्पियनशिपच्या लढती मुंबई इंडियन्सचा सामना न्यूयॉर्क सिएटल ओर्कास संघाविरुद्ध होणार आहे.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने सर्वाधिक पाच विजेतेपद मिळवली आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने ही सर्व विजेतेपद मिळवली आहेत. मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० अशी पाच विजेतेपद मिळवली आहेत. तर टी-२० चॅम्पियन लीगचे २०११ आणि २०१३ साली त्यांनी विजेतेपद मिळवले होते. आयपीएलमधील यशस्वी संघ असलेल्या मुंबईची नजर आता अमेरिकेतील चॅम्पियन होण्याची आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here