नवी दिल्ली: भारताचा कर्णधार याने सोशल मीडियावरून तो बाप होणार असल्याची माहिती सर्वांना दिली. विराटसह अनुष्काने देखील सोशल मीडियावरून आई होणार असल्याचे सांगितले. विरुष्काने ही गोड बातमी दिल्यानंतर क्रिकेट आणि सिने जगतातून या दोघांवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

वाचा-

आम्ही दोनाचे तीन होणार आहोत. जानेवारी २०२१ मध्ये बाळ आमच्या सोबत असेल, अशा मेसेजसह विराट आणि अनुष्का यांनी सोशल मीडियावर दोघांचा एक फोटो शेअर केला.

वाचा-
या घोषणेनंतर भारतीय संघातील त्याचे सहकारी आणि चाहते सोशल मीडियावरून शुभेच्छा देऊ लागले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने देखील विराट कोहली आणि यांना शुभेच्छा दिल्या. बीसीसीआयने अभिनंदन विराट आणि अनुष्का असे म्हणत एक ट्विट केले.

तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने त्यांच्या अनोख्या स्टाइलमध्ये विराट कोहलीला शुभेच्छा दिल्या.

अनुष्का आणि विराट दोघंही पहिल्यांदा २०१३ मध्ये एकमेकांना भेटले होते. तेव्हा एका जाहिरातीत त्यांनी एकत्र काम केले होते. यावेळी दोघांची चांगली मैत्री झाली आणि दोघे एकमेकांसोबत चांगला वेळ काढू लागले. लवकरच ते एकमेकांना डेटही करू लागले होते. जानेवारी २०१४ मध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून भारतात परत आली तेव्हा तिथे विराटसोबत अनुष्काही होती. तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ मध्ये दोघांनी इटलीमध्ये राजेशाही थाटात लग्न केले.

वाचा-
सध्या विराट आयपीएलसाठी यूएईला गेला आहे. करोनामुळे तो जवळपास पाच महिने घरी होता. दोघांनी एकमेकांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ या काळात शेअर केले. या लॉकडाउनच्या काळात अनुष्का आणि विराटने एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवला. या लॉकडाउनच्या काळात विराट पूर्णपणे आयसोलेशनमध्ये होता. युएईला जातानाही त्याने टीमसोबत न जाता स्वतःच्या खासगी विमानाने युएईला जाणे सोईस्कर मानले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here