यावर्षी मिळालेल्या तीन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे २९ ऑगस्टला होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात या तीन खेळाडूंना सहभागी होता येणार नसल्याचे समजते आहे.

वाचा-

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने याबाबत माहिती देताना सांगितले की, ” यावर्षी एकूण ७४ खेळाडूंना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते. पण ७४ पैकी ६५ खेळाडू या पुरस्कार सोहळ्यामध्ये सहभागी होता येणार आहेत. कारण तीन खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे, तर काही खेळाडू आयसोलेशनमध्ये आहेत. त्याचबरोबर काही खेळाडू देशाबाहेर आहेत. त्यामुळे ९ खेळाडू या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार नाहीत. भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माला खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता. पण तो आयपीएल खेळण्यासाठी सध्या युएईमध्ये आहे.”
वाचा-

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने पुढे सांगितले की, ” राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या तीन खेळाडू करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळेच सर्व केंद्रांवर आता सॅनिटायझेशन केले आहे. त्याचबरोबर सुरक्षित अंतर ठेवून सर्व बंदोबस्त करण्यात आले आहेत.”

वाचा-

यावर्षी राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा हा ऑनलाई़न करण्यात येणार आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन सर्वांना संबोधित करतील. त्याचबरोबर क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि काही व्यक्ती हे विज्ञान भवन येथून या सोहळ्याला उपस्थिती लावतील.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here