युएईला जाण्यापूर्वी चेन्नईच्या संघाचे सराव शिबीर त्यांच्या घरच्या मैदानात आयोजित करण्यात आले होते. सर्व खेळाडू १४ ऑगस्टला या शिबिरासाठी आपल्या घरुन चेन्नईला पोहोचले आणि त्यानंतर २० ऑगस्टपर्यंत हे शिबिर सुरु होते. पण या शिबिरात धोनीने नेमकी काय जादू केली, हे आता समजले आहे.
चेन्नईच्या संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, ” आम्ही सहा दिवसांसाठी चेन्नईमध्ये खेळाडूंसाठी सराव शिबिराचे आयोजन केले होते. कारण संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला वाटत नव्हते, की संघाने थेट भारतातून युएईला जावे. त्यामुळे आम्ही १५ ते २० ऑगस्ट या कालामधीमध्ये सराव शिबिराचे आयोजन केले होते. पण या शिबिराचे धोनीला आयोजन का करावेसे वाटले, हे सर्वात महत्वाचे आहे.”
धोनीने शिबिराचे आयोजन का करायला सांगितले, पाहा…धोनीला क्रिकेट विश्वात उगाच महान कर्णधार म्हटले जात नाही. कारण धोनी क्रिकेटचा नेहमीच वेगळा विचार करत आला आहे आणि त्यामध्ये त्याला यश मिळाले आहे. त्यामुळेच आतापर्यंत धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने तीन आयपीएलची जेतेपदे पटकावली आहेत. प्रत्येक स्पर्धेसाठी एक प्रक्रिया असते. जर स्पर्धा जिंकायची असेल तर त्या प्रक्रियेनुसारच काम करावे लागते.
याबाबत विश्वनाथ यांनी सांगितले की, ” धोनीने आयोजित केलेल्या या सराव शिबिराचा खेळाडूंना चांगलाच फायदा झाला. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी कोणता खेळाडू कशा परिस्थितीत आहे, हे पाहणे महत्वाचे असते. कोणता खेळाडू किती फिट आहे आणि तो आपली कामगिरी कशी करू शकतो, हे सराव शिबिरात पाहायला मिळाले. खेळाडूही चांगल्या मूडमध्ये आले. धोनीनेही या सराव शिबिरात धडाकेबाज फलंदाजी केली. त्यामुळे या आयपीएलसाठी या शिबिराचा नक्कीच फायदा संघाला होणार आहे.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times