बॉलीवूडचा अभिनेता सुशांतसिंग राजपूतबाबतचा एक मोठा खुलासा भारताच्या एका क्रिकेटपटूने केला आहे. भारताच्या या क्रिकेटपटूने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला असून यामध्ये सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती ही खोटं बोलत असल्याचे आता समोर आले आहे.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आता रियाची सीबीआय चौकशी करत आहेत. त्यामधून बऱ्याच गोष्टी आता पुढे येत आहेत. त्यामध्येच भारताच्या एका क्रिकेटपटूने रिया सुशांतबाबत किती खोटं बोलते, याचा पुरावा त्याने दिलेला आहे. या पुराव्यामध्ये रिया सुशांतबद्दल कसं खोटं बोलत होती, हे समोर आले आहे.

रियाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ” मी आणि सुशांत आम्ही दोघं युरोपच्या ट्रिपला गेलो होता. पॅरिसमध्ये असताना सुशांत आपल्याला लोकं ओळखतील म्हणून तीन दिवस घराबाहेर पडला नव्हता. सर्वात आधी या ट्रिपमध्ये आम्ही पॅरिसला गेलो होतो. तिथे आपल्याला कोणी ओळखणार नाही आणि आपल्याला धमाल करता येईल, असे सुशांत मला म्हणाला होता. पण पॅरिसला गेल्या सुशांत तीन दिवस आपल्या रुमच्या बाहेरच पडला नव्हता. सुशांतला नेमके काय झाले होते, हे मला कळत नव्हते.”

रियाने आपल्या मुलाखतीमध्ये सुशांत पॅरिसमध्ये आपल्या घराबाहेर पडला नव्हता, असे म्हटले होते. पण रियाचे हे म्हणणे किती खोटे आहे, हे भारताचा क्रिकेटपटू मनोज तिवारीने दाखवून दिले आहे. पॅरिसमध्ये असताना सुशांत घराबाहेर पडला होता आणि त्याने येथील डिस्नीलँडला गेला होता, असे मनोजने म्हटले आहे. सुशांत जेव्हा फिरायला गेला होता त्याचा व्हिडीओच मनोजने आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यामुळे रिया सुशांतबाबत किती खोटं बोलते, हे आता समोर आले आहे.

सुशांतचा व्हिडीओ पोस्ट केल्यावर मनोज म्हणाला की, ” रिया म्हणते की पॅरिसला गेल्यावर सुशांत आपल्या घरातून तीन दिवस बाहेरच पला नव्हता. पण रिया खोटं बोलत आहे. कारण पॅरिसमध्ये डिस्नीलँड येथे सुशांत फिरायला गेला होता, हा घ्या पुरावा…”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here