सेलिब्रेटींची मुलं नेहमीच चर्चेचा विषय होत असतात. तैमूरचे जेव्हा नाव ठेवण्यात आले तेव्हापासून तो चर्चेचा विषय ठरला आहे. कारण त्याच्या नावावरून बराच वाद झाला होता. त्यानंतर नेहमीच तैमूर हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतो. आतापर्यंत तैमीरवर बरेच व्हिडीओ आणि पोस्ट आल्या आहेत. त्यामध्ये तैमूरबाबत बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात.
आता विराट आणि अनुष्का यांच्या घरी बाळ येणार. त्यामुळे आता त्याचीच जास्त चर्चा सुरु होणार आणि तैमूर सोशल मीडियावर पिछाडीवर पडणार, असे म्हटले जाते. याबाबतच्याच पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या पाहायला मिळत आहेत.
विराटच्या घरी पाळणा हलणार, याची भविष्यवाणी काही वर्षांपूर्वीच झाल्याचे चाहते आता म्हणत आहेत. कारण याबाबतचे एक ट्विट आता चांगलेच व्हायरल झालेले आहे. एक व्यक्ती काही ट्विट करत असतो आणि काही वर्षांनी त्या गोष्टी समोर येत असल्याचे आता समोर येत आहे. चाहत्यांनीही सोशल मीडियावर या गोष्टीला दुजोरा दिल्याचे पाहायला मिळत आहे. कोहली आणि अनुष्का यांच्या आयुष्यात जानेवारी महिन्यात आनंदाची बातमी येणार आहे. पण याबाबतचे एक ट्विट काही वर्षांपूर्वीच केल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.
वाचा-
कोहली आणि अनुष्का यांच्या गूड न्यूजबाबतचे जे ट्विट व्हायरल झाले आहे त्यामध्ये ५ जानेवारी अशी तारीख देण्यात आली आहे. हे ट्विट २०१५ साली केल्याचे पाहायला मिळत आहे. हे ट्विट कोणी केले आहे, याची उत्सुकता आता तुम्हाला असेल. तर हे ट्विट इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने केल्याचे पाहायला मिळत आहे. आर्चर जे ट्विट करतो ते काही वर्षांनी खरे होते, असे चाहते म्हणत आहेत. काही दिवसांपूर्वी आर्चरचे सुशांतसिंग राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांच्याबाबतचे एक ट्विटही व्हायरल झाले होते. यामध्ये आर्चरने रियाचे नाव घेतले होते आणि त्याचबरोबर दुसऱ्या शब्दांत फास याबाबतचा उल्लेख होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times