आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघातील सदस्यांना करोनाची लागण झाल्याचे आता पुढे आले आहे. आजपासून चेन्नईचा संघ दुबई येथे सराव करणार होता. पण त्यापूर्वीच संघातील एका सदस्यांना करोनाची लागण झाल्याचे आता पुढे आला आहे. आयपीएलसाठी हा एक धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनी सांगितले की, दुबईमध्ये पोहोचल्यावर चेन्नईच्या संघाची करोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचे अहवाल आले असून त्यानुसार चेन्नईच्या संघातील काही व्यक्तींना करोना झाल्याचे आता समजते आहे. पण खेळाडू, सपोर्ट स्टाफ किंवा अधिकारी कोणाला करोना झाला आहे, हे मात्र सांगण्यात आलेले नाही. त्याचबरोबर करोना झालेल्या व्यक्तींचे नावही सांगण्यात आलेले नाही.

दुबईला पोहोचल्यावर चेन्नईचा संघ सहा दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये होता. त्यानंतर आता या चाचणीत संघातील काही सदस्य करोनाबाधित असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता चेन्नईच्या संपूर्ण संघाला यापुढील सात दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा करोनाची चाचणी होणार आहे. या चाचणीत जर खेळाडू करोना निगेटीव्ह आढळले तरच त्यांना सराव करता येणार आहे.

युएईला जाण्यापूर्वी चेन्नईच्या संघाचे सराव शिबीर त्यांच्या घरच्या मैदानात आयोजित करण्यात आले होते. सर्व खेळाडू १४ ऑगस्टला या शिबिरासाठी आपल्या घरुन चेन्नईला पोहोचले आणि त्यानंतर २० ऑगस्टपर्यंत हे शिबिर सुरु होते. पण या शिबिरात धोनीने नेमकी काय जादू केली, हे आता समजले आहे.

चेन्नईच्या संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, ” आम्ही सहा दिवसांसाठी चेन्नईमध्ये खेळाडूंसाठी सराव शिबिराचे आयोजन केले होते. कारण संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला वाटत नव्हते, की संघाने थेट भारतातून युएईला जावे. त्यामुळे आम्ही १५ ते २० ऑगस्ट या कालामधीमध्ये सराव शिबिराचे आयोजन केले होते. पण या शिबिराचे धोनीला आयोजन का करावेसे वाटले, हे सर्वात महत्वाचे आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here