आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपद जिंकलेली महिला कुस्तीपटू विनेश फोगटला करोनाची बाधा झाल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे आता क्रीडा क्षेत्रातील बऱ्याच जणांना करोनाची बाधा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आज आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्स संघाच्या १३ सदस्यांना करोनाची बाधा झाल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये एका खेळाडूचाही समावेश आहे. त्याचबरोबर १२ सपोर्ट स्टाफमधील व्यक्तींना करोना झाला आहे.

वाचा-

काल राष्ट्रीय पुरस्कारांबाबत एक बातमी प्रकाशित झाली होती. त्यामध्येही तीन राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या खेळाडूंना करोना झाल्याचे सांगितले गेले होते. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावता येणार नाही.

वाचा-

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने याबाबत माहिती देताना सांगितले की, ” यावर्षी एकूण ७४ खेळाडूंना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते. पण ७४ पैकी ६५ खेळाडू या पुरस्कार सोहळ्यामध्ये सहभागी होता येणार आहेत. कारण काही खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे, तर काही खेळाडू आयसोलेशनमध्ये आहेत. त्याचबरोबर काही खेळाडू देशाबाहेर आहेत. त्यामुळे ९ खेळाडू या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार नाहीत.”

वाचा-

सध्याच्या घडीला आयपीएल खेळण्यासाठी सर्व संघ युएईमध्ये दाखल झालेले आहेत. रोहित शर्मा आणि इशांत शर्माही आयपीएल खेळण्यासाठी युएईमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे रोहित आणि इशांत या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत, असे म्हटले जात आहे.

वाचा-

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने पुढे सांगितले की, ” राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या तीन खेळाडू करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळेच सर्व केंद्रांवर आता सॅनिटायझेशन केले आहे. त्याचबरोबर सुरक्षित अंतर ठेवून सर्व बंदोबस्त करण्यात आले आहेत.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here