आयपीएलपूर्वीच आता चेन्नई सुपर किंग्स संघाला एकामागून एक धक्के बसत आहेत. बीसीसीआयने सर्वच संघांना आयपीएलसाठी काही सुरक्षेचे उपाय करायला सांगितले होते. पण बीसीसीआयचे न ऐकताच चेन्नईच्या संघाने एक गोष्ट केली आणि त्या गोष्टीचाच त्यांना आता पश्चाताप होत असेल, असे म्हटले जात आहे.

आयपीएल सुरु होण्यापूर्वी फक्त चेन्नई सुपर किंग्स संघालाच करोनाचे धक्के बसल्याचे पाहायला मिळाले आहे. चेन्नईच्या संघातील खेळाडूंना युएईमध्ये पोहोचल्यावर काही नियम मोडले आणि त्याचाच फटका आता त्यांना बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. युएईच्या विमानतळावर काही स्थानिक लोकांना जादूची झप्पी दिल्यामुळे चेन्नईचे खेळाडू अडचणीत सापडल्याचे म्हटले जात आहे. पण त्याचबरोबर बीसीसीआयचा एक नियम त्यांनी मोडल्याचेही समजत आहे.

यंदाच्या आयपीएलसाठी बीसीसीआयने चांगलीच कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. त्यासाठी बीसीसीआयने काही कडक नियमही बनवले होते. पण चेन्नईच्या संघाने ते नियम पाळले नाहीत, त्यामुळेच त्यांच्या संघावर आता ही वेळ आल्याचे म्हटले जात आहे. चेन्नईच्या संघाने बीसीसीआयची कोणती गोष्ट ऐकली नाही, पाहा…

आयपीएल खेळण्यासाठी सर्व संघांना युएईला जायचे होते. पण त्यापूर्वी कोणत्याही संघाने भारतामध्ये शिबिर घेऊ नये, असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. पण चेन्नईच्या संघाने बीसीसीआयच्या या गोष्टीला जास्त गंभीरपणे घेतले नाही आणि त्यांनी चेन्नईमध्ये शिबिर घेतले होते. सहा दिवस चाललेल्या या शिबिरामध्ये खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ एकत्र आले होते. त्यावेळीच चेन्नईचा संघ अडचणीत सापडायला सुरुवात झाली, असे म्हटले जात आहे.

भारतामध्ये करोनाचे संक्रमण सुरु आहे. अन्य देशांपेक्षा भारतामध्ये करोनाचे वातावरण जास्त गंभीर असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच बीसीसीआयने सर्व संघांतील खेळाडूंना भारतामध्ये सराव शिबिर आयोजित करू नका, असे ठणकावून सांगितले होते. पण चेन्नईच्या संघाने त्यांची ही गोष्ट ऐकली नाही आणि आता त्यांना एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत. आता चेन्नईच्या उर्वरीत संघातील सदस्यांना सात दिवस जास्त क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. त्यानंतर त्यांची करोना चाचणी घेण्यात येणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here