आयपीएल सुरक्षितपणे खेळले जावे, यासाठी बीसीसीआयने खबरदारी घेतलेली आहे. त्यासाठी बीसीसीआय आयपीएलशी निगडीत जवळपास सर्वांच्या करोना चाचण्या करत आहे. आतापर्यंत बीसीसीआयने किती केल्या करोना चाचण्या आणि किती जणं आढळले पॉझिटीव्ह, ते जाणून घेऊया…

वाचा-

यावेळी बीसीसीआयने आपल्या करोना चाचण्यांबाबतही माहिती सर्वांना दिली आहे. बीसीसीआयने २० ऑगस्टपासून करोना चाचण्या करायला सुरुवात केली. बीसीसीआयने भारतामध्ये एकही करोना चाचणी केली नाही. सर्व खेळाडू युएईमध्ये आल्यावर २० ऑगस्टपासून बीसीसीआयने करोना चाचणी करायला सुरुवात केली. यामध्ये बीसीसीआयने खेळाडूंबरोबरच सपोर्ट स्टाफ, संघ व्यवस्थापन, बीसीसीआय आणि आयपीएलचे कर्मचारी, हॉटेल कर्मचारी या सर्वांची चाचणी केली आहे.

युएईला आल्यावर आयपीएलशी निगडीत प्रत्येक व्यक्तीची चाचणी बीसीसीआयने केली. बीसीसीआयने २० ऑगस्ट ते २८ ऑगस्ट या कालावधीमध्ये आतापर्यंत एकूण १९८८ करोना चाचण्या केल्याचे पाहायला मिळत आहे. ही माहिती बीसीसीआयनेच दिलेली आहे. आयपीएलसाठी पहिल्यांदा किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ युएईला रवाना झाले होते. त्यामुळे सर्वात आधी त्यांच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या आणि त्यांच्या संघातील एकालाही करोनाची बाधा नसल्याचे समोर आले.

वाचा-

बीसीसीआयच्या अहवालानुसार आतापर्यंत १९८८ करोना चाचण्यांमध्ये १४ जणांना करोना झाल्याचे पुढे आले आहे. शुक्रवारी चेन्नईच्या संघातील एका खेळाडूसह १२ सपोर्ट स्टाफच्या सदस्यांना करोना झाला होता. आज वैयक्तिक कारणास्तव रैनाने संघाला सोडचिठ्ठी दिली आहे. तो यावर्षीच्या आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने स्पष्ट केले आहे. हा धक्का बसतो ना बसतो तोच धोनीच्या संघाला दुसरा हादरा बसला आहे. कारण चेन्नईच्या संघातील महाराष्ट्राचा एक खेळाडू करोना पॉझिटीव्ह आढळला आहे. ऋतुराज गायकवाड, असे चेन्नईच्या या युवा खेळाडूचे नाव आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here