भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हे लवकरच आई-बाबा होणार आहेत. या दोघांनी सोशल मीडियावरून गुड न्यूज शेअर केली होती. पण आता त्यांनी या गूड न्यूजचे सेलिब्रेशनही केले आहे. दुबईमध्ये एका हॉटेलमध्ये आरसीबी संघाच्या खेळाडूंबरोबर विराटने आपला आनंद साजरा केला. यावेळी विराट आणि अनुष्का यांनी केक कापून आनंद साजरा केला. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

वाचा-

विराट आणि अनुष्का यांनी गुरुवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या घरी पाळणा हलणार असल्याची बातमी दिली होती. त्यावेळी विराट आणि अनुष्का हे दुबईमध्ये होते. आयपीएल खेळण्यासाठी कोहली आरसीबीच्या संघाबरोबर दुबईला आलेला आहे. यावेळी कोहलीने आपल्या आनंदाच्या बातमीनंतर सर्व खेळाडूंना एक पार्टीही दिली. या सेलिब्रेशनचा व्हिडीओ विराटच्या आरसीबीच्या संघाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

विराटने ही गूड न्यूज दिल्यावर बीसीसीआयसह काही खेळाडूंनीही कोहलीचे अभिनंदन केले. विराट हा संघाबरोबर क्वारंटाइनमध्ये होता. त्यानंतर करोना चाचणीनंतर आरसीबीचे सर्व खेळाडूंना कोहलीने एक पार्टी दिली. या पार्टीमध्ये कोहली आणि अनुष्कासह संघातील काही खेळाडू उपस्थित होते. यावेळी कोहलीने अनुष्कासाठी खास ड्रेस घेतला होता. त्याचबरोबर एक मोठा फ्रुट केकही मागवला होता. विराट आणि अनुष्का यांनी हा केक कापत आपला आनंद साजरा केला.

वाचा-

विराट सध्या आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी युएईमध्ये आहे. मार्च महिन्यापासून विराट आणि अनुष्का मुंबईत एकत्र होते. करोना व्हायरसमुळे ना क्रिकेट सुरू होते ना चित्रपटाचे शुटिंग यामुळे या दोघांनी मोठा कालावधी एकत्र घालवला. आता क्रिकेट पुन्हा सुरू होत आहे. विराट याच आठवड्यात युएईला दाखल झाला. गुरुवारी या दोघांनी सोशल मीडियावरून गुड न्यूज शेअर केली होती.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here