Satara News: सातारा (Satara) जिल्ह्यातील ऊसतोड करणाऱ्या दामप्त्याच्या लेकीनं कौतुकास्पद कामगिरी केलीय. माणदेशातील वरकुटे-मलवडीजवळील पाटलुची वस्ती येथील ऊसतोड मजूर सदाशिव आटपाडकर आणि नकुसा आटपाडकर यांची मुलगी काजलने भारतीय हॉकी संघात स्थान पटकावले आहे. काजलने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, नियमित सराव आणि आत्मविश्वासाने भारतीय ज्युनिअर हॉकी संघात स्थान मिळवलंय. आंतरराष्ट्रीय खेळाडू काजल आटपाडकर ही जर्मनीतील ड्युसेलडॉर्फ येथे चार देशांच्या ज्युनिअर हॉकी स्पर्धेचे नेतृत्व करणार आहे.

नकुसा आटपाडकर (काजलची आई)

काजलच्या यशामागचे श्रेय खऱ्या अर्थाने तिच्या शिक्षकांबरोबर आई-वडिलांचेही आहे. जे आईवडील ऊसतोड कामगार म्हणून सहा सहा महिने गावोगावी फिरून पालावर राहतात. तर राहिलेले सहा महिने गावाकडे येऊन मिळेल तेथे मजुरी करतात. मजुरी करुन कुटुंब चालवणारे नकुसा आटपाडकर आणि सदाशिव आटपाडकर यांची मुलगी काजलने अटकेपार झेंडा फडकावून भारताचे नाव रोशन करण्यासाठी ती जिद्दीने हॉकी स्पर्धेत उतरली आहे. तिच्या झालेल्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. 

सदाशिव आटपाडकर (काजलचे वडील)

साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा 

सातारा जिल्ह्यातील माण तालुका हा पाण्यापासून वंचित असलेला. त्यामुळं अभ्यास करणं आणि पुढे सरकनं हेच एकमेव ध्येय ठेवून या भागातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात. त्यात ललीता बाबरसारख्या खेळाडूंमुळं विद्यार्थांना प्रोत्सहान मिळत गेलं. माण खटाव फलटण भागातील अनेक विद्यार्थी हे खेळांच्या स्पर्धेसाठी मोठी कसरत करताना पाहायला मिळत आहेत. दगड धोंड्यांमधून पळणारी ललीता बाबर शिखरावर पोहोचली. तसेच स्वप्न बाळगनारी काजल आटपाडकर हीने देखील साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. खेचरावरचं बिऱ्हाड घेऊन ऊस तोडीसाठी गावोगावी जाणाऱ्या कुटुंबातील काजलनं आज कौतुकास्पद कामगिरी केलीय. नकळत्या वयातच शिक्षकांनी तिच्यातली चुनुक ओळखली आणि आई वडिलांना समजावलं. तिला स्पोर्टस बरोबर शाळेला बाहेरच्या जिल्ह्यात टाकले. कुटुंबाला याचा आर्थिक त्रास सहन करावा लागला आणि याची जाण काजलनं ठेवली. काजल हळूहळू पुढं सरकत गेली आणि तिने भारताच्या हॉकी स्पर्धेसाठी निवड झालेल्या टिममध्ये स्थान पटकावले. 

आयर्लंडमधील स्पर्धेत भारताला रौप्य पदक 

काजल भारताच्या हॉकी संघाच्या सराव शिबिरात सहभागी झाली. त्यानंतर तिने भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. आयर्लंड येथील स्पर्धेत भारताला रौप्य पदक जिंकून देण्यात तिने निर्णयात्मक भुमिका बजावली आहे. तसेच झारखंड येथील सिमडेगा येथे झालेल्या 11 व्या राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या संघातील उल्लेखनीय कामगिरीबद्दाल राज्य शासनातर्फे तिला 50 हजाराचे बक्षीसही मिळाले होते. तिच्या याच एक एक पैलुंमुळे शिक्षक आणि ग्रामस्थांनाही मोठं कौतुक वाटतंय.

महत्त्वाच्या बातम्या:

आई-बाबांना स्मार्टफोन घेऊन द्यायचाय, भारताला जेतेपद मिळवून देणारी महिला खेळाडू भावूक

sports

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here