हैदराबादमध्ये पाकिस्तानचा श्रीलंकेविरुद्धचा सामना आता गुरुवार, १२ ऑक्टोबरशिवाय मंगळवारी, १० ऑक्टोबरला होणार आहे आणि लखनऊमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा ऑस्ट्रेलियाचा मोठा सामना एक दिवस मागे सरकवण्यात आला आहे आणि आता शुक्रवार १३ ऑक्टोबरऐवजी १२ ऑक्टोबरला होणार आहे.
त्याचप्रमाणे, न्यूझीलंडचा बांगलादेश विरुद्धचा सामना, जो चेन्नई येथे १४ ऑक्टोबर रोजी नियोजित होता, तो आता शुक्रवार, १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि तो दिवस-रात्र स्पर्धा म्हणून खेळवला जाईल. स्पर्धेच्या प्राथमिक टप्प्यापासून, धर्मशाला येथे बांगलादेश विरुद्ध इंग्लंड सामन्याच्या वेळेतही किरकोळ बदल करण्यात आला आहे, तो सकाळी १०:३० वाजता (स्थानिक वेळेनुसार) सुरू होईल.
विश्वचषक २०२३ च्या अखेरीस तीन सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. १२ नोव्हेंबरला इंग्लंडची पाकिस्तानशी आणि ऑस्ट्रेलियाची बांगलादेशशी स्पर्धा होणार होती. आता हे दोन्ही सामने ११ नोव्हेंबरला होणार आहेत. यासह भारत आणि नेदरलँड यांच्यात ११ नोव्हेंबरला होणारा सामना आता १२ नोव्हेंबरला होणार आहे. बंगळुरूमध्ये होणारा हा सामनाही ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना असेल. दिवाळीसुद्धा १२ नोव्हेंबरलाच आहे.
५ ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात
वर्ल्ड कप २०२३ ला ५ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. अहमदाबादमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना होणार आहे. उपांत्य फेरीचे सामने १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी खेळवले जातील. नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबरला विजेतेपदाचा सामना होणार आहे.
भारतीय संघाचं सुधारित वेळापत्रक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ८ ऑक्टोबर – चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान – ११ ऑक्टोबर – दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान – १४ ऑक्टोबर – अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश – १९ ऑक्टोबर – पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड – २२ ऑक्टोबर – धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड – २९ ऑक्टोबर – लखनऊ
भारत विरुद्ध श्रीलंका – २ नोव्हेंबर – मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ५ नोव्हेंबर – कोलकाता
भारत विरुद्ध नेदरलँड्स – ११ नोव्हेंबर – बंगळुरू

टीम इंडियाचं नवं वेळापत्रक
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & More