नवी दिल्ली: आयपीएलचे तीन वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला १३व्या हंगामापूर्वी मोठा धक्का बसला आहे. संघातील दोघा खेलाडूंसह १३ जणांना करोनाची लागण झाली आहे. दीपक चाहर आणि ऋतुराज गायकवाड यांना करोना झाल्याचे समोर आले आहे. त्यातच संघाचा उपकर्णधार सुरेश रैना देखील वैयक्तीक कारणामुळे या वर्षी खेळणार नाही. तो भारतात परतला असून या वर्षी आपण उपलब्ध नसल्याचे त्याने म्हटले आहे.

वाचा-
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सीएसके संघावर मोठे संकट आले आहे. यामुळेच बीसीसीआयने त्यांना काही अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणे करून ते सध्याच्या संकटातून बाहेर पडू शकतील. आता चेन्नईचा संघ स्पर्धेतील पहिला सामना खेळणार नाहीत. १९ सप्टेंबर रोजी आयपीएलचा पहिला सामना होणार आहे. दर वर्षी प्रमाणे गतविजेता आणि गत उपविजेता यांच्यात हा सामना होतो.

वाचा-

पण चेन्नई संघावर आलेल्या या संकटामुळे बीसीसीआयने वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे सीएसके संघाला थोडा वेळ मिळले. आधी ठरल्यानुसार सीएसके संघ त्यांचा सराव २८ ऑगस्ट रोजी सुरू करणार होता. पण आता पूर्ण संघाचा क्वारंटाइन कालावधी ६ दिवसाचा वाढवण्यात आला आहे. तर जे लोक करोना पॉझिटिव्ह आले आहेत त्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. संबंधित लोक तेव्हाच जैव सुरक्षित वातावरणात येऊ शकतील जेव्हा त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह येतील.

वाचा-
आता चेन्नईचा संघ पुढील आठवड्यात सराव सुरू करू शकेल जेव्हा सर्व काही नॉर्मल होईल आणि खेळाडूंची चाचणी नेगेटिव्ह येईल. स्पर्धेतील पहिला सामन्यासाठी दुसऱ्या संघाचा विचार करत आहे. जे रोहित शर्माच्या नेतृत्वााखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध खेळतील.

आता यामुळेच आधीच उशीर झालेले आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यास बीसीसीआयकडून आणखी वेळ लागत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here