नवी दिल्ली: चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज या वर्षी युएईमध्ये होणारी सोडून भारतात परतला. रैना वैयक्तीक कारणामुळे भारतात परतल्याचे बोलले जात होते. पण सोमवारी संघाचे मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष यांनी यश त्याच्या डोक्यात गेल्याचे वक्तव्य केले होते.

रैनाने वैयक्तीक कारणामुळे नव्हे तर संघात अचानक १३ जण करोना पॉझिटिव्ह आणि हॉटेलमधील रुमवरून झालेल्या वादानंतर भारतात परतण्याचा निर्णय घेतल्याच्या वृत्ताला श्रीनिवासन यांनी दुजोरा दिला. रैनाबद्दल अशी माहिती समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांना देखील धक्का बसला होता. पण आता श्रीनिवासन यांनी यावर खुलासा केला आहे. माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावल्याचे त्यांनी म्हटले.

वाचा-
यासंदर्भात श्रीनिवासन यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी सविस्तर चर्चा केली. ते म्हणाले, चेन्नई संघात रैनाचे योगदान दुसऱ्या क्रमांकाचे नाही. मला वाइट वाटेत की या गोष्टीचा लोक चुकीचा अर्थ काढत आहेत.

वाचा-
चेन्नई संघात रैनाचे योगदान प्रत्येक वर्षी शानदार राहिले आहे. आता आपल्याला हे समजून घेणे गरजेच आहे की रैना कोणत्या परिस्थितीत आहेत आणि त्याला वेळ देणे गरजेचे आहे, असे श्रीनिवासन म्हणाले. २००८ पासून रैना चेन्नईकडून खेळतोय. तो चेन्नई बॉय आहे धोनीला ‘थाला’ तर रैना ‘चिन्नाथाला’ असे नाव मिळाले आहे.

वाचा-
रैनाने आयपीएलमध्ये १८९ डावात एक शतक, ३८ अर्धशतकांसह दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्रइकरेट १३७.१४ इतका आहे. रैनाने धोनी पेक्षा ३ सामने अधिक खेळले आहेत.

त्याच्या सारख्या शानदार खेळाडूसोबत संघ नेहमी उभा आहे. या अवघड दिवसात रैनाला आमचे संपूर्ण सहकार्य असेल, असे श्रीनिवासन म्हणाले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here