आयपीएल सुरु होण्यापूर्वीच संघांना एकामागून एक धक्के बसत आहेत. कारण स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच आयपीएलच्या संघांमधून खेळाडू माघार घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखील चेन्नई सुपर किंग्सला धक्के बसले होते. पण आता राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का बसू शकतो, असे म्हटले जात आहे. कारण राजस्थानच्या संघातील एक दिग्गज खेळाडू आता माघार घेऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

वाचा-

सध्याच्या घडीला आयपीएलला करोनाचे ग्रहण लागल्याचे पाहायला मिळत आहे. कारण एकिकडे आयपीएलमधील संघांचे सदस्य करोना सापडत आहेत. दुसरीकडे काही खेळाडू स्पर्धेपूर्वीच माघार घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच बीसीसीआयने अजूनही आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केलेले पाहायला मिळत नाही. आता चेन्नईच्या संघातील सदस्य करोना निगेटीव्ह सापडलेले आहेत. त्यामुळे आता बीसीसीआय आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करू शकते, असे वाटत आहे.

वाचा-

राजस्थानच्या संघात यावर्षी बरेच बदल झालेले आहेत. त्यामध्येच आता जर हा दिग्गज खेळाडू आयपीएलला मुकरणार असेल तर राजस्थानच्या संघाला मोठा धक्का बसू शकतो. कारण हा एक अष्टपैलू खेळाडू असून त्याने बरेच सामने एकहाती जिंकवून दिले आहेत.

कोण आहे हा दिग्गज अष्टपैलू खेळाडू…राजस्थानच्या संघातील कोणता अष्टपैलू खेळाडू स्पर्धेपूर्वीच माघार घेऊ शकतो, याची उत्सुकता तुम्हाला लागलेली असेल. या अष्टपैलू खेळाडूने विश्वचषक जिंकवण्यातही महत्वाची भूमिका बजावली होती, हा अष्टपैलू खेळाडू आहे इंग्लंडचा बेन स्टोक्स. सध्याच्या घडीला स्टोक्स हा इंग्लंडच्या संघाबरोबर नाही. कारण काही वैयक्तिक कारणांसाठी तो न्यूझीलंडला रवाना झाला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला पाकिस्तानविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये स्टोक्स खेळताना दिसत नाही.

यापूर्वी स्टोक्सने बऱ्याच चांगल्या खेळी साकारल्या आहेत. राजस्थानबरोबर गेली काही वर्षे जोडला गेलेला आहे. त्यामुळे संघातील खेळाडूंशी त्यांचे सूर जोडलेले आहेत. त्यामुळे जर स्टोक्स यावर्षी खेळणार नसेल तर तो राजस्थानसाठी मोठा धक्का असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here